हेलिकॉप्टरसाठी राष्ट्रपतींकडून हवंय कर्ज; महिलेच्या मागणीने गाव अचंबित

president.
president.

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील मंदसौर जिल्ह्यातील एका महिलेने राष्ट्रपतींना पत्र लिहून आपल्या शेतापर्यंत जाण्यासाठी म्हणून हेलिकॉप्टर घेण्यासाठी कर्ज देण्याची मागणी केली आहे. वास्तवात त्या महिलेच्या शेजारच्या शेतमालकाने तिच्या शेताकडे जाणारा रस्ता अडवून ठेवला आहे. महिलेने रस्त्यासाठी अनेकवेळा तक्रार दाखल केली मात्र, तिची समस्या काही सुटली नाही. यामुळे त्रासलेल्या महिलेने हेलिकॉप्टरसाठी कर्ज देण्याची मागणी थेट राष्ट्रपतींकडे केली आहे. सध्या हे पत्र सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. 

काय आहे संपूर्ण प्रकरण?
हे पत्र मंदसौरमधील बसंती बाई नावाच्या महिलेने लिहले आहे. बसंती बाईचे नातेवाईक विनोद यांनी सांगितलं की, रस्त्यासाठी तक्रार करुन करुन बसंती  बाई त्रासून गेल्या होत्या. त्यानंतर त्यांनी अधिकाऱ्यांना आणि राष्ट्रपतींना आपली अडचण सांगण्याचा निर्णय घेतला. त्या तक्रार नोंदवण्यासाठी म्हणून टायपिस्टकडे गेल्या. लिहता-लिहता टायपिस्टने विचारलं की जर आपल्या शेताकडे जाणारा रस्ता अडवला गेलाय तर तुम्ही शेताकडे कसं जाल?

यावर बसंती बाई उत्स्फुर्तपणे म्हणाल्या की, रस्ता देणार नाहीत तर काय आम्ही हेलिकॉप्टरने आमच्या शेतात जावं का? एकतर रस्ता मोकळा करुन द्या किंवा शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या. मग काय? टायपिस्टने देखील बसंती बाईंचं पोटतिडकीतून आलेलं ते म्हणणं आहे तसंच आपल्या मागणीत लिहून टाकलं. याबाबतचे वृत्त मीडियामध्ये पसरल्यानंतर स्थानिक आमदार यशपाल सिंह सिसोदिया या महिलेच्या मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. यशपाल सिंह सिसोदिया यांचं म्हणणं आहे की, महिलेला शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नसेल तर आम्ही त्या महिलेला जरुर मदत करु. मात्र मी हेलिकॉप्टर तर देऊ शकत नाही. मात्र, हे पत्र तरी अद्याप पोस्टाने राष्ट्रपतींकडे पाठवलं गेलं नाहीये. मात्र स्थानिक पातळीवर हे पत्र चांगलंच व्हायरल झालं आहे. बसंती बाईच्या नातेवाईकांना आशा आहे की, सोशल मीडियाच्या माध्यमातून हे पत्र राष्ट्रपतींपर्यंत जरुर पोहोचेल आणि बसंती बाईंची समस्या दूर होईल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com