
Heart Attack : हृदयाचे १६ हजार ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरचा हार्ट अटॅकने मृत्यू; रुग्णांना अश्रू अनावर
गुजरातमधील प्रसिध्द कार्डियोलॉजिस्ट गौरव गांधी यांचं निधन झालं आहे. १६ हजारांहून अधिक हार्ट सर्जरी करणारे गौरव गांधी यांचा हार्ट अटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. गुजरातमधील जामनगर येथे राहाणारे गौरव गांधी यांचं वय फक्त ४१ वर्ष होतं. दुसऱ्याच्या हृदयाची काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचा हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
गौरव गांधी हे दररोजप्रमाणे सोमवारी रुग्णांची तपाणी केली आणि रात्री ते आपल्या घरी परतले. कुटुंबियांसोबत जेवन केलं आणि झोपायला निघून गेले. मात्र सकाळी सहा वाजता जेव्हा कुटुंबातील सदस्यांना त्यांची तब्यत बिघडल्याचं दिसून आलं . छातीत दुखत असल्याच्या त्रासानंतर त्यांनी जीजी रुग्णालयात नेण्यात आलं.
मात्र वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. गौरव गांधी यांच्या मृत्यूची माहिती समजतानाच रुग्णालयाबाहेर लोकांनी गर्दी केली होती. गांधी यांनी उपचार केलेले अनेक रुग्णांनी देखील रुग्णालयाबाहेर गर्दी केली होती. ज्यांचा गौरव गांधी यांनी जीव वाचवला अशा रुग्णांना अश्रू अनावर झाल्याचं देखील यावेळी पाहायला मिळालं.
गौरव गांधीने जामनगर येथून एमबीबीएस आणि नंतर एमडीची डिग्री घेतली होती. यानंतर कार्डियोलॉजीचे शिक्षण अहमदाबाद येथून घेतली. ते जामनगर येथे प्रॅक्टिस करत होते. प्रदेशातील सर्वात चांगले डॉक्टर अशी त्यांची ओळख बनली होती.
काही वर्षांमध्येच त्यांनी १६ हजाराहून अधिक हार्ट सर्जरी केल्या होत्या. तसेच फेसबुकवर 'हाल्ट हर्ट अटॅक' अभियानाशी देखील त्यांचा सहभाग होता.सोशल मीडियाच्या माध्यामातून तसेच सेमिनारमधून ते हृदयाशी संबंधीत समस्यांबद्दल जनजागृतीचं काम देखील करत.