Kolkata : भवानीपूरमध्ये ५३ टक्के मतदान

प्रियांका टिबरेवाल यांनी चांगली लढत दिल्याने बॅनर्जी यांच्या मतांमध्ये घट होण्याची शक्यता
kolkatta
kolkatta sakal

कोलकता : पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उमेदवारीने प्रतिष्ठेची ठरलेल्या भवानीपूरसह जग्नीपूर व समशेरगंज विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत गुरुवारी मतदान झाले. भवानीपूरमध्ये सायंकाळी पाचपर्यंत ५३ टक्के मतदान झाले. ममता बॅनर्जी यांनी दुपारी तीननंतर मतदान केले.

भवानीपूर या परंपरागत मतदारसंघातून बॅनर्जी यांचा विजय होईल, असे दावा जाणकार करीत असले तरी भाजपच्या प्रियांका टिबरेवाल यांनी चांगली लढत दिल्याने बॅनर्जी यांच्या मतांमध्ये घट, असे बोलले जात आहे.

समशेरगंज व जग्नीपूर येथे अनुक्रमे ५७.१५ व ५३.७८ टक्के मतदान झाले. पद्दापुकुर येथे एका शाळेतील केंद्रावर बनावट मत देणाऱ्या दोघांना पकडल्याचा दावा भाजपचे मुख्य निवडणूक प्रतिनिधी कल्याण चौबे यांनी केला. ‘बनावट मतदारांना पकडल्यावर काही वेळाने आठ-दहा लोग मोटारसायकलवरून आले आणि त्‍यांनी माझ्यावर व माझ्या मोटारीवर काठ्या व दगडांनी हल्ला केला.

ते सर्वजण तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते होते,’ असा आरोप चौबे यांनी केला. ‘तृणमूल’च्या नेत्याला मारहाण केल्याच्या आरोपावरून भाजपच्या एका समर्थकाला अटक करण्‍यात आली. यावरून मत देण्यासाठी तृणमूल काँग्रेसने काही जणांना पैसे पुरविल्याचा व खोटे मतदान झाल्याचा आरोप टिबरेवाल यांनी केला. दक्षिण कोलकतामधील जिल्हा मतदान अधिकाऱ्यांनी तो फेटाळून लावला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com