काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा धुडगूस; 'द ऍक्‍सिडेंटल..' रोखण्यासाठी थिएटर फोडले 

वृत्तसंस्था
शनिवार, 12 जानेवारी 2019

कोलकाता : माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कारकिर्दीवर आधारित 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटाचे प्रदर्शन रोखण्याच्या प्रयत्नांत काँग्रेस कार्यकर्त्यांनी एका थिएटरची तोडफोड केली. कोलकत्यामध्ये काल (शुक्रवार) दिवसभर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिमेचे दहन करत या चित्रपटाचा निषेध केला. 

काल रात्री साडेआठ वाजता क्वेस्ट मॉलमधील थिएटरमध्ये काँग्रेसचे काही कार्यकर्ते पक्षाचा झेंडा घेऊन जोरदार घोषणाबाजी करत घुसले. मॉलच्या सुरक्षा यंत्रणेला त्यांना रोखणे शक्‍य झाले नाही. हा जमाव थिएटरमध्ये घुसला आणि चित्रपटगृहातील पडदाच फाडला. पोलिसांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. 

या घटनेचा संदर्भ देत अभिनेते अनुपम खेर यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर टीका केली. 'तुमचेच कार्यकर्ते अभिव्यक्ती स्वातंत्र्याविषयीची तुमची मते वाचत नाहीत', असे खेर यांनी म्हटले आहे. 'द ऍक्‍सिडेंटल प्राईम मिनिस्टर'मध्ये अनुपम खेर यांनी डॉ. मनमोहनसिंग यांची भूमिका साकारली आहे. 

Web Title: Kolkata cinema playing The Accidental Prime Minister vandalised