Kolkata Doctor Death: गुप्तांग अन् चेहऱ्यावर वार.. महिला डॉक्टरची हॉस्पिटलमध्ये अत्याचार करून हत्या, पेटले बंगाल..

Doctor murder Sexual assault Raped: या घटनेचा निषेध करत राज्यातील हजारो ज्युनिअर डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले.
Kolkata Doctor Death
Kolkata Doctor Death
Updated on

कोलकता- पश्चिम बंगालमधील कार वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिचा खून करण्यात आल्याची घटना उघडकीस झाल्यानंतर राज्यामध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेचा निषेध करत राज्यातील हजारो ज्युनिअर डॉक्टर, रुग्णालय कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी धरणे आंदोलन केले. दोषी नराधमांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे.

उत्तर कोलकत्यातील रुग्णालयाच्या सेमिनार हॉलमध्ये या महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. प्राथमिक शवविच्छेदन अहवालातून नराधमांनी पीडितेवर अत्याचार करून तिचा खून केल्याचे उघड झाले आहे. रुग्णालयाच्या व्यवस्थापनाने देखील या घटनेची सखोल चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. पीडित महिला डॉक्टर ही फुफ्फुस निदान केंद्रामध्ये कार्यरत होती. ती गुरुवारी रात्री रुग्णालयामध्ये कामाला आली होती.

Kolkata Doctor Death
Worli Hit and Run: मिहीर शहाने तीन दिवस फरार राहून केला 'गेम'! पोलिसांना झटका; घटनेला नवे वळण
Loading content, please wait...

Related Stories

Doctor Found Dead Inside Car in Latur; Authorities Investigating Cause of Death
Why was woman doctor assaulted in Kolhapur?
Fast-Track Trial Ends With Death Sentence in Toddler Murder Case
Bhagalpur Builder Murder Case
Marathi News Esakal
www.esakal.com