

Summary
भूकंपाची खोली जमिनीखाली सुमारे १० किलोमीटर होती.
कोलकाता, उत्तर बंगाल, कूच बिहार व दिनाजपूरमध्ये धक्के जाणवले.
सुदैवाने, कुठेही जीवित किंवा मालमत्तेचे नुकसान झाल्याची नोंद नाही.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे शुक्रवारी सकाळी भूकंपाचा धक्के बसले. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ५.६ इतकी होती. त्याचा केंद्रबिंदू शेजारच्या बांगलादेशातील तुंगी येथे होता. घाबरून लोक घराबाहेर पडले. सकाळी १०:१० वाजता भूकंपाचे धक्के जाणवले.