'हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा'; काय म्हणाल्या ममता बॅनर्जी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Mamata Banerjee

सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम वाद उफाळून आलाय.

'हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडा आणि राज्य करा'; काय म्हणाल्या ममता बॅनर्जी?

कोलकाता : सध्या देशभरात हिंदू-मुस्लिम (Hindu-Muslim) वाद उफाळून आलाय. त्यातच आता हनुमान चालिसा (Hanuman Chalisa), मशिद भोंगे यांसारखे मुद्देही चांगलेच गाजत आहेत. याच पार्श्वभूमीवर पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपवर (BJP) जोरदार निशाणा साधलाय. ईदच्या पार्श्वभूमीवर त्या म्हणाल्या, आज देशात फूट पाडा आणि राज्य करा, हे धोरण राबवलं जातंय; पण हे पूर्णपणे चुकीचं आहे. काही लोक हिंदू आणि मुस्लिमांना वेगळं करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्यांचा डाव हाणून पाडा, असं आवाहन त्यांनी जनतेला केलंय. ईदनिमित्त जनतेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.

कोलकात्यात नमाज पठणानंतर ममता बॅनर्जींनी जनतेला संबोधित केलं. केंद्र सरकारवर निशाणा साधताना त्या म्हणाल्या, अच्छे दिन लाएंगे असं सरकार म्हणत होतं, पण कुठे आहेत अच्छे दिन? अच्छे दिनाच्या नावाखाली भाजप सरकार हिंदू-मुस्लिमांमध्ये फूट पाडत आहे. सध्या देशातील परिस्थिती योग्य नाहीय. फूट पाडा आणि राज्य करा हे धोरण राबवलं जातंय; पण घाबरू नका, मी याविरुध्द लढत राहीन. मी, माझा पक्ष किंवा माझं सरकार असं काहीही करणार नाहीय, असं आश्वासन त्यांनी दिलं.

भाषणापूर्वी ममता बॅनर्जींनी ट्विट करून ईदनिमित्त देशवासियांना शुभेच्छा दिल्या. त्यांनी ट्विटमध्ये लिहिलंय, प्रत्येकाला आनंद, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा! आपलं ऐक्य आणि एकोप्याचं नातं अधिक घट्ट होवो ही प्रार्थना. अल्लाह सर्वांना आशीर्वाद देईल, असं त्यांनी नमूद केलंय.

Web Title: Kolkata Mamata Banerjee On Eid Alleged Politics Of Isolation In Country Said Divide And Rule Not Good Kolkata

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top