'जीएसटी'चा हॉटेल व्यवसायावर नकारात्मक परिणाम : "ईआयएच'

वृत्तसंस्था
बुधवार, 2 ऑगस्ट 2017

कोलकता : वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणालीत हॉटेलांवरील कर वाढला असून, याचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार आहे, असे ओबेरॉय हॉटेल साखळीची पालक कंपनी "ईआयएच'ने म्हटले आहे.

कोलकता : वस्तू व सेवाकर (जीएसटी) प्रणालीत हॉटेलांवरील कर वाढला असून, याचा व्यवसायावर नकारात्मक परिणाम होणार आहे, असे ओबेरॉय हॉटेल साखळीची पालक कंपनी "ईआयएच'ने म्हटले आहे.

"ईआयएच'ची वार्षिक सर्वसाधारण सभा आज झाली. या वेळी बोलताना कार्यकारी उपाध्यक्ष एस. एस. मुखर्जी म्हणाले, ""याआधी हॉटेलांवरील कर सुमारे 19 ते 20 टक्के होता. जीएसटीमध्ये तो 28 टक्‍क्‍यांवर गेला आहे. या जादा करामुळे व्यवसायावर नकारात्मक परिणाम होत आहे. याचा नेमका किती परिणाम होतो, हे तपासावे लागेल.
नवी दिल्लीतील कंपनीचे हॉटेल नूतनीकरणासाठी बंद असून, ते जानेवारी 2018 मध्ये पुन्हा सुरू होईल. या नूतनीकरणासाठी पाचशे कोटी रुपये खर्च येणार आहे. नूतनीकरणानंतर हॉटेलमध्ये आधीपेक्षा कमी खोल्या असतील.''

""नवी दिल्लीतील हॉटेलचे नूतनीकरण करण्यामुळे कंपनीच्या उत्पन्नाला फटका बसत आहे. मात्र, यामुळे भविष्यातील तोटा कमी करण्याचा प्रयत्न कंपनी करीत आहे. कंपनीने चंडिगड आणि संयुक्त अरब अमिरातीमध्ये दोन हॉटेलांचे व्यवस्थापन करण्यास सुरवात केली आहे,'' असे मुखर्जी यांनी नमूद केले.

Web Title: kolkata naews gst and hotel eih