तोंडी तलाकबाबतचे विधेयक राजकीय हेतूने प्रेरित: ममता बॅनर्जी

श्‍यामल रॉय
शुक्रवार, 5 जानेवारी 2018

कोलकता: पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी अखेर आज तोंडी तलाकप्रश्नी आपले मौन सोडत "मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण विधेयक' राजकीय हेतून प्रेरित असल्याचा आरोप केला आहे.

बिरभूम येथे आयोजित एका जाहीर सभेत त्या बोलत होत्या. ""तोंडी तलाकला गुन्हेगारी चौकटीत आणण्याची तरतूद असलेल्या या विधेयकामुळे मुस्लिम महिलांचे, तसेच त्यांच्या अधिकारांचे संरक्षण होण्याऐवजी नसत्या अडचणी उभ्या राहणार आहेत. या विधेयकात बऱ्याच त्रुटी असून, याचा मुस्लिम समुदायाला मोठा धक्का बसेल,'' असा दावा त्यांनी या वेळी केला.

तृणमूल कॉंग्रेस व ममता बॅनर्जी यांनी या विषयावर सुरवातीपासून मौन बाळगले होते. याबाबतचे विधेयक लोकसभेत चर्चेला आले तेव्हाही पक्षाच्या सदस्यांनी चर्चेत भाग घेतला नाही. मुस्लिम मतदार पक्षापासून दुरावला जाईल, ही भीती त्यांना होती, असे आरोपही त्यांच्यावर झाले होते.

मतदार यादीतून नावे गायब
आसाममध्ये भाजपचे सरकार सत्तेत आल्यापासून तेथे अनेक वर्षांपासून स्थायिक असलेल्या अनेक बंगाली नागरिकांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली असून, एनसीआरमध्येही त्याची नोंद नसल्याचा आरोप ममता बॅनर्जी यांनी केला. एनसीआरमधून नाव गायब झाल्याचे लक्षात आलेल्या एका बंगाली नागरिकाने आत्महत्या केल्याची माहिती ममता यांनी दिली.

Web Title: kolkata news The bill on oral talaq is politically motivated: Mamata Banerjee