ममता बॅनर्जी- त्रिपाठी वादात राजनाथसिंह यांची उडी

पीटीआय
गुरुवार, 6 जुलै 2017

कोलकता - पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी आज गृहमंत्री राजनाथसिंह यांना उत्तर 24 परगणा येथे उसळलेल्या जातीय दंगलीची माहिती दिली. दरम्यान, पश्‍चिम बंगालचे राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात सुरू असलेल्या संघर्षात गृहमंत्री राजनाथसिंह यांनी उडी घेतली आहे.

राजनाथसिंह यांनी दोघांशीही चर्चा केली असून, संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. दोघांनीही कोणत्याही प्रकारचे वक्तव्य करू नये आणि पदाचा मान राखावा, असेही आवाहन राजनाथसिंह यांनी केले आहे. राजभवनातील सूत्रानुसार, राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी राजनाथसिंह यांना फोनवरून घटनेची माहिती दिली, तसेच सद्यःस्थितीही सविस्तरपणे सांगितली. यादरम्यान, राजनाथसिंह म्हणाले, की उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील बसीरहाट येथे कायदा आणि सुव्यवस्था सामान्य करण्यासाठी प्राधान्य देण्याची गरज आहे. तसेच, निष्काळीजपणाचा मुद्दा शांतता प्रस्थापित झाल्यानंतरच उपस्थित करावा. फेसबुकवर वादग्रस्त पोस्टच्या मुद्द्यावरून राज्यपाल केसरीनाथ त्रिपाठी यांनी ममता बॅनर्जी यांना फोन केला होता. या वेळी झालेल्या चर्चेत राज्यपालांनी जे मत मांडले आहे, त्यावरून ममता संतापल्या आहेत. ममता बॅनर्जी यांनी केलेले आरोप तथ्यहीन असल्याचे राज्यपाल त्रिपाठी यांनी स्पष्ट केले आहे.

Web Title: kolkata news mamta banerjee rajnathsingh marathi news sakal news