

Summary
कोलकातामध्ये २४ तासांत २५१.४ मिमी पावसाने १३७ वर्षातील सहावा सर्वाधिक पाऊस नोंदला गेला.
वीज पडून किमान ८ जणांचा मृत्यू, तर वाहतूक, शाळा आणि विमान सेवा मोठ्या प्रमाणात विस्कळीत.
ममता बॅनर्जी सरकारने परिस्थिती अभूतपूर्व सांगून दुर्गापूजेची सुट्टी आगाऊ जाहीर केली आणि लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले.
पश्चिम बंगालची राजधानी कोलकातामध्ये मुसळधार पावसाने परिस्थिती बिकट झाली आहे. मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने शहरात प्रचंड हाहाकार माजवला. वीज पडून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जो गेल्या तीन वर्षातील सर्वाधिक आहे. मुसळधार पावसामुळे विमान सेवा रेल्वे आणि रस्ते वाहतूक विस्कळीत झाली आहे. शाळा आणि महाविद्यालये बंद आहेत. परिस्थिती इतकी गंभीर आहे की ममता बॅनर्जी यांच्या सरकारला दोन दिवस आधीच दुर्गापूजेची सुट्टी जाहीर करावी लागली आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी ही परिस्थिती अभूतपूर्व सांगितले आणि लोकांना घरात राहण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी नियंत्रण कक्ष स्थापन करण्याची घोषणाही केली आहे.