कोलकात्याच्या व्यापाऱ्याला काळा पैसा प्रकरणात अटक

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कोलकातास्थित एका व्यापाऱ्याला कथितरीत्या तब्बल 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी अटक केली.

नवी दिल्ली : नोटाबंदीनंतर मनी लॉंड्रिंग कायद्यांतर्गत चौकशी दरम्यान सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) कोलकातास्थित एका व्यापाऱ्याला कथितरीत्या तब्बल 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक किमतीच्या जुन्या नोटा बदलून दिल्याप्रकरणी अटक केली.

या व्यापाऱ्याचे नाव पारस एम. लोढा असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली असून, त्याला या प्रकरणात चौकशीनंतर काल (बुधवारी) अटक करण्यात आली. अधिकाऱ्याने सांगितले की, एका परिपत्रकाच्या आधारावर सर्वप्रथम बुधवारी ईडीच्या अधिकाऱ्यांनी मुंबईमध्ये लोढाची चौकशी केली. लोढा विमानाने तेथून पळून जाण्याच्या प्रयत्नात होता. चौकशी पथकाने त्याला शेखर रेड्डी आणि रोहित टंडन प्रकरणांत 25 कोटी रुपयांपेक्षा अधिक जुन्या नोटांना नव्या नोटांमध्ये बदलून देण्यासंबंधीच्या प्रकरणात अटक केली.

काळा पैसा प्रतिबंधक कायद्यातील तरतुदीअंतर्गत न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर लोढाला सात दिवसांची कोठडी सुनावण्यात आली. रेड्डी प्रकरण चेन्नईशी संबंधित असून, प्राप्तिकर विभागाने 142 कोटी रुपयांपेक्षा अधिक रक्कम जप्त केली आहे. दिल्ली आणि प्राप्तिकर विभागाने येथील टंडनच्या एका न्यायालयीन फर्ममधून साडेतेरा कोटी रुपये जप्त केले होते. रेड्डीला काल केंद्रीय अन्वेषण विभागाने अटक केली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kolkata trader arrested