

Taratala Warehouse Shed Collapse
ESakal
दक्षिण कोलकातामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ताराताला ट्रान्सपोर्ट डेपो जवळ बांधकाम सुरू असलेले एक गोदामाचे शेड बुधवारी दुपारी दीड वाजता अचानक कोसळले. या घटनेत आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. ५० ते ५५ जण अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, आतापर्यंत चार जणांना वाचवण्यात आले आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे.