

Summary
कोरबा पोलिसांनी बाईक चोरी करणाऱ्या टोळीला अटक केली असून त्यांचा मास्टरमाइंड जयसिंग पटेल आहे.
जयसिंग १० वर्षे जंगलात झोपडीत लपून राहत होता आणि फक्त चोरीसाठी बाहेर पडत होता.
तो श्रीमंत असल्याचे भासवून ६ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढत होता आणि चोरीच्या पैसे त्यांच्यावर खर्च करत होता.
छत्तीसगड मधील कोरबा पोलिसांनी एका मोटारसायकल्सची चोरी करण्याऱ्या टोळीला ताब्यात घेतलं आहे. मात्र त्यांच्या म्होरक्याचे कारनामे ऐकून पोलिसही अवाक् झाले आहेत. हा चोर १० वर्षांपूर्वी गायब झाल होता आणि जंगलात एक झोपडीत राहत होता. तो फक्त बाईक चोरी करण्यासाठी बाहेर पडत असे नंतर जंगलात जाऊन लपत असे. श्रीमंत असल्याचे भासवून त्याने ६ मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढले होते. चोरीच्या बाईक्स विकून आलेले पैसे तो या गर्लफ्रेंड्सवर उडवत असे, मात्र पोलिसांनी आता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत.