कुलभूषण जाधव व मंत्री राठोड होते वर्गमित्र

वृत्तसंस्था
बुधवार, 12 एप्रिल 2017

नवी दिल्लीः भारतीय नौदलातील निवृत्त अधिकारी व पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेले कुलभूषण जाधव आणि माहिती प्रसारण राज्यमंत्री राजवर्धनसिंग राठोड हे वर्गमित्र होते.

खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये (एनडीए) 30 वर्षांपुर्वी दोघे एका वर्गात शिकत होते. आज, जाधव हे पाकिस्तानच्या ताब्यात तर राठोड मंत्री आहेत.

एनडीएमध्ये सन 1991 मध्ये दोघे बरोबर शिक्षण घेत होते. जाधव पुढे भारतीय नौदलामध्ये दाखल झाले होते तर राठोड यांनी पुढे डेहराडूनमध्ये जाऊन लष्कराचा एक वर्षांचा अभ्यासक्रम पुर्ण केला होता. दोघांनीही पुढे सेवानिवृत्ती स्विकारली होती. ऑलिंपिकमध्ये राठोड यांना रौप्य पदक मिळाले होते. सन 2014 मध्ये त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता. राठोड सध्या मंत्री आहेत.

जाधव यांनी भारतीय नौदलातून सेवानिवृत्ती घेतल्यानंतर इराणमध्ये व्यवसाय सुरू केला होता. 3 मार्च 2016 रोजी बलुचिस्तानमधून पाकिस्तानी सुरक्षा अधिकाऱ्यांनी जाधव यांना अटक केली. खरं तर जाधव यांचे इराणमधून अपहरण करण्यात आले होते. पाकिस्तानने हेरगिरीच्या आरोपावरून त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.

Web Title: Kulbhushan Jadhav, minister Rathore were batchmates