कुलभूषण यांना तोपर्यंत फाशी नाही; बसित यांचे संकेत

वृत्तसंस्था
सोमवार, 22 मे 2017

जाधव हे पाकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून पालन करण्यात येईल. अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांना फाशी देण्यात येणार नाही. 

नवी दिल्ली - पाकिस्तानच्या कैदेत असलेले भारताचे माजी नौदल अधिकारी कुलभूषण जाधव यांच्यावरील खटल्याप्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालय जोपर्यंत अंतिम निकाल देत नाही, तोपर्यंत त्यांना फाशी देण्यात येणार नसल्याचे संकेत पाकिस्तानचे भारतातील उच्चायुक्त अब्दुल बसित यांनी दिले आहेत. जाधव हे सुरक्षित असल्याचे प्रथमच पाककडून स्पष्ट करण्यात आले आहे.

हेरगिरीच्या आरोपांवरून पाकिस्तानने कुलभूषण जाधव यांना अटक केलेली आहे. त्यांना तेथील लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरोधात भारताने आंतरराष्ट्रीय न्यायालयात धाव घेतली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयात या प्रकरणावर सुनावणी होत त्यांच्या फाशीला अंतिम निर्णय येईपर्यंत स्थगिती देण्यात आली आहे.

बसित यांनी म्हटले आहे, की जाधव हे पाकिस्तानमध्ये सुरक्षित आहेत. या प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या निर्णयाचे पाकिस्तानकडून पालन करण्यात येईल. अंतिम निर्णय येईपर्यंत त्यांना फाशी देण्यात येणार नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय कायदे पाळण्यासाठी कटीबद्ध आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने कॉन्सलर ऍक्सेसबद्दल स्पष्ट काहीही म्हटलेले नाही.

Web Title: Kulbhushan Jadhav safe till final ICJ order, hints envoy