काँग्रेसला मोठा धक्का; 'हा' दिग्गज नेता भाजपच्या ताफ्यात

काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलात प्रदेशाध्यक्षपदासाठी नावाचा विचार न केल्यानं ते बंडखोर झाले होते.
Kuldeep Bishnoi Join BJP
Kuldeep Bishnoi Join BJPesakal
Summary

काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलात प्रदेशाध्यक्षपदासाठी नावाचा विचार न केल्यानं ते बंडखोर झाले होते.

हरियाणा काँग्रेसचे (Haryana Congress) दिग्गज नेते कुलदीप बिश्नोई (Kuldeep Bishnoi) यांनी भारतीय जनता पक्षात (BJP) प्रवेश केलाय. त्यांनी आज (गुरुवार) अधिकृतपणे पक्षात प्रवेश केला. काल बुधवारीच बिश्नोई यांनी चंदीगडमधून आदमपूरच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता. विशेष म्हणजे, त्यांची काँग्रेसनं (Congress) जूनमध्येच हकालपट्टी केली होती. राज्यसभा निवडणुकीतही त्यांनी क्रॉस व्होटिंग केलं होतं.

कुलदीप बिश्नोई यांनी आमदारकीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केलाय. प्रदीर्घ बंडखोरीनंतर त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसमध्ये नुकत्याच झालेल्या फेरबदलात प्रदेशाध्यक्षपदासाठी नावाचा विचार न केल्यानं ते बंडखोर झाले होते. आदमपूर मतदारसंघ पोटनिवडणुकीत त्यांचा मुलगा भव्य बिश्नोई भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवणार असल्याचं वृत्त आहे.

Kuldeep Bishnoi Join BJP
न्यायमूर्ती ललित बनणार देशाचे नवे सरन्यायाधीश; रमना यांनी केंद्राकडं पाठवली शिफारस

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर (Haryana CM Manohar Lal Khattar) यांनी भाजप मुख्यालयात त्यांचं स्वागत केलं. ते म्हणाले, 'बिश्नोई यांच्या आगमनानं पक्षाला मदत होणार आहे.' आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत आणि काँग्रेसमध्ये असतानाही नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत भाजपला पाठिंबा दिल्याचं बिश्नोईंनी सांगितलं. 10 जून रोजीही त्यांनी राज्यसभा निवडणुकीत क्रॉस व्होट केलं होतं. त्या निवडणुकीत काँग्रेसनं अजय माकन यांना उमेदवारी दिली होती, तर भाजप आणि जननायक जनता पार्टी (जेजेपी) समर्थित उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी बिश्नोईं यांना सर्वपक्षीय पदावरून हटवण्यात आलं होतं.

Kuldeep Bishnoi Join BJP
काँग्रेसवाले पूर्वी 'सत्याग्रह' म्हणायचे, पण आता..; संबित पात्रांची गांधी परिवारावर टीका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com