esakal | 'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास?
sakal

बोलून बातमी शोधा

Kumar_Vishwas

केरळमधील तिरुअनंतपुरम विमानतळ हे केंद्र सरकारने ५० वर्षांसाठी अदानी समूहाला भाड्याने दिले आहे. यास केरळ सरकारनेही विरोध दर्शविला आहे.

'जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत...'; काय म्हणाले कुमार विश्वास?

sakal_logo
By
वृत्तसंस्था

नवी दिल्ली : ट्विटरवर सतत सक्रिय असणारे कवी आणि आम आदमी पक्षाचे माजी नेते कुमार विश्वास यांनी एअरपोर्ट आणि एअरलाइन्सचे खासगीकरण करण्याच्या मुद्द्यावर ट्विट केले आहे. यावेळी त्यांनी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या विधानावर निशाणा साधला आहे. पुरी यांनी म्हटले आहे की, सरकारने विमान कंपन्या आणि विमानतळ चालवू नयेत. याचा खरपूस समाचार घेत कुमार विश्वास यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, मग सरकारनेही सरकार चालवू नये.

हे वाचा - PM मोदींच्या डोळ्यात राग कधी दिसणार? चीनने पुन्हा केलेल्या कुरापतीनंतर काँग्रेसचा सवाल

'एनडीटीव्ही' या इंग्रजी वृत्तवाहिनीची बातमी शेअर करत ट्विट केले आहे की, 'हो, बरोबर आहे! जेव्हा देव स्वत: आपला देश चालवत आहेत, तेव्हा आपण राष्ट्रीय विमानतळ, राष्ट्रीय रेल्वे, राष्ट्रीय बंदरे, विद्यापीठे, राष्ट्रीय महामार्ग, रुग्णालये, विद्युत कंपन्या इ. का चालवाव्यात? सरकारनेही सरकार चालवू नये. भारतमातेचा विजय असो!'

भारत-चीन सीमेवर पुन्हा एकदा झटापट

दरम्यान, रविवारी (ता.३०) एका डिजिटल बैठकीत हरदीपसिंग पुरी म्हणाले की, "मी मनापासून सांगू इच्छितो की सरकारने विमानतळ चालवू नये आणि सरकारनेही विमानसेवा चालवू नये."

त्याचबरोबर त्यांनी एअर इंडिया या सरकारी विमान कंपनीच्या खासगीकरणाचा उल्लेखही केला. एअर इंडियासाठी योग्य निविदा मिळाल्यास त्याचे खाजगीकरण केले जावे. या वर्षाच्या अखेरीस ही सरकारी विमानसेवाही खासगी होईल, अशी अपेक्षा पुरी यांनी व्यक्त केली.

देशभरातील विमानतळांच्या खासगीकरणाबद्दल पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. केरळमधील तिरुअनंतपुरम विमानतळ हे केंद्र सरकारने ५० वर्षांसाठी अदानी समूहाला भाड्याने दिले आहे. यास केरळ सरकारनेही विरोध दर्शविला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)