कुमारस्वामींचे सरकार लवकरच कोसळणार ?

वृत्तसंस्था
मंगळवार, 26 जून 2018

मंत्रिमंडळातील जागावाटप, कॅबिनेट मंत्रिपद या सर्वांमुळे काँग्रेस आणि जेडीएसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच आता 5 जुलैला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात असताना या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

बंगळुरु : कर्नाटकात काँग्रेस आणि जेडीएसचे सरकार अस्तित्वात येऊन काही दिवस झाले असताना आता काँग्रेस आणि जेडीएसमध्ये अर्थसंकल्पावरून वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी यांसारख्या विविध मुद्यांवर काँग्रेस आक्रमक होणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. या सर्व मुद्यांवरून मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्मामी यांचे सरकार कोसळणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

पुढील महिन्यात 5 जुलैला कर्नाटकातील मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या सरकारचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. या अर्थसंकल्पापूर्वीच कुमारस्वामींचे सरकार कोसळेल, अशी शक्यता वर्तवण्यात येते आहे. मंत्रिमंडळातील जागावाटप, कॅबिनेट मंत्रिपद या सर्वांमुळे काँग्रेस आणि जेडीएसमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले होते. तसेच आता 5 जुलैला राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जात असताना या अर्थसंकल्पावरून काँग्रेसचे नेते आक्रमक झाले आहेत.

दरम्यान, कुमारस्वामी सरकार सत्तेवर आल्यापासून नाराज असलेले काँग्रेसचे आमदार विरोधी पक्ष असलेल्या भाजपला साथ देतील, अशी शक्यता आहे. काँग्रेसच्या आमदारांनी भाजपला साथ दिल्यास कुमारस्वामी यांचे सरकार अल्पमतात येऊन त्यांचे सरकार कोसळले असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Web Title: Kumaraswamy government might be fall in soon