कुमारस्वामी सरकार जास्त काळ टिकणार नाही : अमित शहा

वृत्तसंस्था
शनिवार, 19 मे 2018

नवी दिल्ली : कर्नाटकात येणारे सरकार अपवित्र युतीचे आहे, ते जास्त काळ टिकणार नाही, असा दावा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी केला आहे.

दिल्लीत एका दूरचित्रवाणी वाहिनीच्या कार्यक्रमात शहा बोलत होते. ते म्हणाले, कर्नाटकात आम्हाला यश मिळाले आहे. 40 वरुन 104 जागांवर आम्ही पोहचलो आहोत. कर्नाटक प्रचारात देवेगौडा काँग्रेसवर टीका करत होते, ते भाजपविरुद्ध बोलत नव्हते. आता एका रात्रीत ते एकत्रित आले आहेत. ही अपवित्र युती आहे. त्यामुळे हे सरकार जास्त काळ टिकणार नाही. 

भाजपवर होत असलेले घोडेबाजाराचे आरोप त्यांनी फेटाळून लावले. आम्ही घोडेबाजार केला असता तर असे झाले असते कां?, असा प्रश्‍न त्यांनी विचारला. 15 दिवसांनी विश्‍वासप्रस्ताव आला असतातरी आम्ही घोडेबाजार केला नसता, असेही ते म्हणाले. 

Web Title: Kumaraswamy government will not last long says Amit Shah