कुंभमेळ्याचा विस्तार यंदा दुपटीने वाढणार 

वृत्तसंस्था
सोमवार, 14 जानेवारी 2019

अलाहाबाद : भारतात दर बारा वर्षांनी भरणारा कुंभमेळा हा जगातील सर्वांत मोठा धार्मिक उत्सव असून, नवीन वर्षात अलाहाबाद येथे त्याला प्रारंभ होणार आहे. यंदा कुंभमेळ्यासाठी 20 किलोमीटरऐवजी 45 किलोमीटरपर्यंतचा परिसर आरक्षित केला आहे. यामुळे वडाच्या झाडाचे स्थान असलेला अक्षय वड व प्राचीन सरस्वती नदीचा स्रोत मानल्या जाणाऱ्या सरस्वती कूपाचेही दर्शन भाविकांना घेता येणार आहे. 

कुंभमेळ्याच्या तयारीची माहिती देताना अलाहाबादच्या महापौर अभिलाषा गुप्ता नंदी म्हणाल्या, की यंदा कुंभमेळ्याचा विस्तार दुपटीने वाढणार आहे. या आधी कुंभमेळा 15 ते 20 किलोमीटर परिसरात होत असे. या वेळी 45 किलोमीटरच्या परिसरात तो होणार आहे. अक्षय वड हा भारतात चार ठिकाणी आढळतो. त्याच ठिकाणी कुंभमेळा भरतो.

या वडाकडे जाण्यासाठी नवीन रस्ता तयार केला जात आहे. हा वड व सरस्वती कूप अलाहाबाद किल्ल्यामध्ये आहे, असे त्यांनी सांगितले. कुंभसाठी भाविक रस्ता, जल व हवाई मार्गाने प्रवास करून येथे पोचत असल्याची घटना यंदा प्रथमच घडत आहे, असे उत्तर प्रदेश प्रशासनातर्फे सांगण्यात आले.

अलाहाबादमधील कुंभमेळ्याला मकरसंक्रांतीला 15 जानेवारीपासून सुरवात होत आहे. त्या दिवशी कुंभातील पहिले शाही स्नान होणार असून, महाशिवरात्रीदिनी म्हणजे 4 मार्च रोजी शाही स्नानाची सांगता होईल.

Web Title: Kumbh Mela will occupy 45 kilometers in 2019