Kuno National Park : कुनोतील चित्त्यांच्या कुटुंबात पाच पिलांचे आगमन; निरवा मादीने दिला जन्म; भारतात संख्या वाढली
Wildlife News : कुनो राष्ट्रीय उद्यानातील मादी चित्ता निरवाने पाच गोंडस पिलांना जन्म दिला आहे. यामुळे भारतातील चित्त्यांची संख्या आता ३१ वर पोहोचली आहे.
भोपाळ : कुनो राष्ट्रीय उद्यानातून (केएनपी) वन्यजीवप्रेमींना एक खूषखबर मिळाली आहे. येथील मादी चित्ता निरवाने पाच पिलांना जन्म दिला आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी नव्या चित्त्यांच्या आगमनाची माहिती दिली.