Medical Student : मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा मोठा तुटवडा; विद्यार्थ्यांना... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Medical Student : मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा मोठा तुटवडा; विद्यार्थ्यांना...

Medical Student : मेडिकल कॉलेजमध्ये मृतदेहांचा मोठा तुटवडा; विद्यार्थ्यांना...

नवी दिल्ली - राजस्थानमधील वैद्यकीय महाविद्यालयांना मृतदेहांच्या कमतरतेमुळे प्रॅक्टिकल्स करण्यात अडचणी येत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिकाऱ्यांनी राजस्थान सरकारकडे बेवारस मृतदेह घेण्याची परवानगी मागितली आहे. या महाविद्यालयांची परिस्थिती अशी आहे की कोटा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ ते दहा मृतदेहांवर २५० विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल्स करावे लागत आहे. (Medical Student news in Marathi)

हेही वाचा: Supreme Court : बिल्किस बानो प्रकरणातील आरोपींना SCचा दणका; आता सुनावणी...

झालावाडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० विद्यार्थ्यांसाठी केवळ सहा मृतदेह आहेत. राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमधील अशी परिस्थिती राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांच्या विरुद्ध आहे. त्याचं कारण म्हणजे वैद्यकीय महाविद्यालयात १० विद्यार्थ्यांना एक प्रॅक्टिकलसाठी १० मृतदेह मिळणे अनिवार्य करण्यात आलं आहे.

हेही वाचा: आता यूपी पळवणार महाराष्ट्रातले उद्योग? CM योगींच्या मुंबई दौऱ्यावर काँग्रेसचा हल्लाबोल

वैद्यकीय विद्यार्थी, फिजीशीयन आणि 'फिजिकल सायन्स'चा अभ्यास करण्यासाठी, मृत्यूची कारणे शोधण्यासाठी, मृतदेहावर प्रॅक्टीस करतात. यासाठी देशभरातील आणि राजस्थानमधील बहुतांश सरकारी वैद्यकीय महाविद्यालये देहदानावर अवलंबून आहेत.

झालावाडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मृतदेहांची कमतरता असल्याचे मान्य करून डीन शिव भगवान शर्मा म्हणाले की, त्यांनी दोन महिन्यांपूर्वीच राज्य सरकारला पत्र लिहून बेवारस मृतदेह प्रॅक्टीकल्ससाठी घेण्याची परवानगी मागितली होती.