esakal | भारताच्या कोविड संकटामागे नेतृत्वाचा अभाव - रघुराम राजन

बोलून बातमी शोधा

Raghuram-Rajan
भारताच्या कोविड संकटामागं नेतृत्वाचा अभाव - रघुराम राजन
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

नवी दिल्ली : भारतातील गेल्या वर्षीच्या कोविडच्या पहिल्या लाटेनंतर पुन्हा एकदा कोरोनाच्या संसर्गात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. या संकटकाळात भारतात दूरदृष्टीचा, नेतृत्वाचा अभाव असल्याचं दिसून आलं आहे, असा दावा आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केला आहे. ब्लूमबर्गला दिलेल्या मुलाखतीत मंगळवारी ते बोलत होते.

हेही वाचा: दूरसंचार विभागाचा मोठा निर्णय; 5G तंत्रज्ञान आणि स्पेक्ट्रमच्या ट्रायलला दिली परवानगी

राजन म्हणाले, “जर तुम्ही काळजीवाहू असाल, जर तुम्ही काळजी घेतली असेल तर तुम्हाला हे कळायला हवं होतं की कोरोनाचं संकट अद्याप संपलेलं नाही. जगातील इतर देशांमध्ये सध्या कोरोनाची काय स्थिती आहे याकडे सर्वांच लक्ष असायला हवं होतं. जगात सध्या भारतचं सर्वाधिक भरडला गेला आहे. सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या ही भारतातच असून मृत्यूंनी देखील विक्रम नोंदवला आहे. हा उद्रेक रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषीत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव वाढत आहे. मात्र, गेल्यावर्षी लॉकडाउनमुळे झालेलं आर्थिक नुकसान टाळण्यासाठी सरकार सध्या लॉकडाउन टाळताना दिसत आहे.

हेही वाचा: प. बंगालमधील हिंसाचारप्रकरणी भाजपची सुप्रीम कोर्टात धाव

"गेल्या वर्षी कोरोनाच्या प्रकरणांमध्ये घट झाल्यानंतर, असा समज होता की आम्ही सर्वात जास्त त्रास सहन करू शकतो आणि आम्ही आता यातून बाहेर पडलो आहोत. त्यामुळे आता सर्वकाही सुरु करण्याची वेळ आली आहे. आपल्या या आत्मसंतुष्टतेमुळेच आम्हाला दुखापत झाली,” असंही मॉनिटरी फंडचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि आता शिकागो विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक राजन यांनी म्हटलं आहे.