लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती स्थिर अन् तणावपूर्ण - लष्करप्रमुख पांडे

लष्करप्रमुख पांडे; चीनशी संवाद सुरू
 army chief manoj pandey
army chief manoj pandeye sakal

नवी दिल्ली : लडाखमधील प्रत्यक्ष ताबा रेषेवरील परिस्थिती ही स्थिर पण तणावपूर्ण असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज दिली. भारतीय सुरक्षा दलाच्या तुकड्या या कोणत्याही आव्हानाला सामोरे जायला तयार असल्याचे त्यांनी नमूद केले.

लष्कर दिनाच्या पार्श्वभूमीवर येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. सध्या उभय देशांतील वादांच्या मुद्यांवर चर्चेच्या माध्यमातून तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जात असून लष्करी आणि राजनैतिक अशा दोन्ही पातळ्यांवर ही चर्चा सुरू असल्याचे पांडे यांनी सांगितले.

पांडे म्हणाले, ‘‘ पूर्व लडाखमधील काही भागांत भारत आणि चीनचे लष्कर आमनेसामने उभे ठाकले असले तरी अन्य काही भागांतून दोन्ही देशांच्या लष्कराने माघार घेतली आहे. जम्मू- काश्मीरमधील घुसखोरीचे प्रयत्न आम्ही हाणून पाडण्याचा प्रयत्न करत आहोत.

जम्मू- काश्मीरमधील एकूण हिंसाचारांच्या घटनांचे प्रमाण हे लक्षणीयरीत्या घटले असले तरीसुद्धा राजौरी- पूँच सेक्टरमध्ये अशा प्रकारच्या घटना वाढल्याचे दिसून येते. सीमावर्ती भागातील दहशतवाद्यांसाठीच्या पायाभूत सुविधा या कायम आहेत. ’’

नवे वर्ष तंत्र स्वीकाराचे

चीन आणि भूतान सीमावादाबाबत जनरल पांडे म्हणाले, ‘‘भूतानसोबतचे सामरिक संबंध आपण बळकट केले असून येथील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. भारत- म्यानमार सीमेवरील परिस्थितीही चिंताजनक आहे.

अग्नीवीर भरती प्रक्रिया योग्य पद्धतीने सुरू असून त्याला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. नवे वर्ष भारतीय लष्करासाठी तंत्र स्वीकाराचे वर्ष असेल या काळात भारतीय लष्कराचे वेगाने आधुनिकीकरण करण्यात येईल.’’

म्यानमारचे ४१६ सैनिक भारतात

म्यानमारमधील लष्करशाही आणि सशस्त्र गट यांच्यात सुरू असलेल्या संघर्षामुळे आतापर्यंत ४१६ म्यानमारी सैनिक सीमा ओलांडून भारतात आले असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल मनोज पांडे यांनी आज दिली.

या सर्व सैनिकांना त्यांच्या देशात परत पाठविले असल्याचेही त्यांनी सांगितले. ‘‘म्यानमारमधील परिस्थितीवर लक्ष आहे. सीमेवरील परिस्थिती चिंताजनक असून सशस्त्र गटांना त्यांच्या सरकारकडून धोका वाटत असल्याने ते मणिपूरमध्ये येत आहेत,’’ असे पांडे म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com