

Ladakh gets gift of development projects worth Rs 3,350 crore; Various works dedicated by Prime Minister
Sakal
लेह : केंद्रशासित प्रदेश लडाखच्या सर्वांगीण विकासाला गती देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी गुरुवारी (ता. १५ ऑक्टोबर) सुमारे ३,३५० कोटी रुपये खर्चाच्या पाच महत्त्वाकांक्षी विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि उद्घाटन करणार आहेत. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या या सोहळ्यात विमानतळ पायाभूत सुविधा, सामरिक रस्ते संपर्क, जलविद्युत, पुरातत्त्व वारसा जतन आणि जलसुरक्षा या क्षेत्रांशी संबंधित प्रकल्पांचा समावेश आहे.