Ladakh : खऱ्या रँचोसाठी भाजपचं ऑफिस जाळलं! लेहमध्ये सोनम वांगचूक यांच्या समर्थनार्थ आंदोलनाला हिंसक वळण

Sonam Wangchuk : लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा मिळावा म्हणून पर्यावरणवादी सोनम वांगचूक यांनी १५ दिवसांपासून उपोषण सुरु केले आहे. दरम्यान आज त्यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी रस्त्यावर उतरले. आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी भाजपचे कार्यालय जाळले.
Students protesting in Leh supporting Sonam Wangchuk’s demand for Ladakh statehood, with clashes reported between demonstrators and police.

Students protesting in Leh supporting Sonam Wangchuk’s demand for Ladakh statehood, with clashes reported between demonstrators and police.

esakal

Updated on

Summary

  1. लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थ्यांचे आंदोलन हिंसक झाले, पोलिसांवर दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले.

  2. वांगचुक १५ दिवसांपासून उपोषण करत असून लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा व सहाव्या अनुसूचीत समावेशाची मागणी करत आहेत.

  3. आंदोलनकर्त्यांच्या मुख्य चार मागण्या आहेत – राज्याचा दर्जा, सहाव्या अनुसूचीत समावेश, दोन लोकसभेच्या जागा आणि आदिवासी दर्जा.

केंद्रशासित प्रदेश लडाखमध्ये सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले असून आंदोलनला हिंसक वळण लागले आहे. पोलिसांवर दगडफेक करण्यात आली असून भाजपचे कार्यालयही जाळण्यात आले आहे. याशिवाय सीआरपीफच्या एका वाहनाला आग लावण्यात आली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com