ईडीनेच माझ्या फ्लॅटमध्ये पैसे ठेवले! अर्पिता चॅटर्जीचा गंभीर आरोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arpita Mukherjee

ईडीनेच माझ्या फ्लॅटमध्ये पैसे ठेवले! अर्पिता चॅटर्जीचा गंभीर आरोप

कोलकाता : फ्लॅटमध्ये सापडलेले पैसे माझे नाहीत, माझ्या अनुपस्थितीत ते तिथं ठेवले गेले, असं विधान अर्पिता मुखर्जी यांनी केलं आहे. मुखर्जी या पश्चिम बंगालमधील शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रमुख आरोपी माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांची जवळच्या सहकारी आहेत. त्यांच्या दोन्ही घरांमध्ये सापडलेल्या रोख रक्कमेचा या प्रकरणाशी संबंध असल्याचा दावा ईडीनं केला आहे. (Money placed in flat in my absence Arpita Mukherjee on seized cash)

हेही वाचा: राऊतांच्या घरातील 'त्या' पैशांशी शिंदेंचा संबंध? मुख्यमंत्र्यांनी स्पष्टचं सांगितलं

शिक्षक भरती घोटाळाप्रकरणी ईडीनं नुकतीच अर्पिता मुखर्जी हीच्या कोलकातातील दोन घरांवर छापेमारी केली. या छाप्यात तिच्या घरातून तब्बल ५० कोटी रुपयांची रोक रक्कम आढळून आली. तसेच पाच किलोंहून अधिक वजनाचे सोन्याचे दागिने आणि बिस्किटही आढळून आली होती. यावेळी मुखर्जी हीनं हे पैसे आपण इतरत्र हालवणार होतो पण तत्पूर्वीच ईडीची रेड पडली, असंही तीनं म्हटलं होतं. पण आता तीनं आपला जबाब बदलला असून माझ्या अनुपस्थितीत फ्लॅटमध्ये पैसे ठेवल्याचा दावा केला आहे.

हेही वाचा: भारतातही अनेक अल-जवाहिरी; त्यांना निवडून मारावे लागेल - खासदार रवी किशन

पश्चिम बंगालचे शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी हे राज्यातील 'क' आणि 'ड' वर्ग शिक्षण भरती प्रकरणी अर्थात अकरावी-बारावीसाठी सहाय्यक शिक्षक आणि प्राथमिक शिक्षक भरती घोटाळ्यातील प्रमुख आरोपी आहेत. या प्रकरणी ईडीनं त्यांच्या चार ठिकाणांवर छापेमारी केली. अर्पिता मुखर्जी हीच्या चौकशीदरम्यान, ईडीला चॅटर्जींच्या या ठिकाणांचा पत्ता लागला. जिथून ईडीनं काही महत्वाची कागदपत्रे जप्त केली. दरम्यान, या प्रकरणी पार्थ चॅटर्जी आणि अर्पिता मुखर्जी यांना ३ ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: Money Placed In Flat In My Absence Arpita Mukherjee On Seized Cash

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :West BengalDesh newsED