esakal | UP: "लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हत्या, केंद्रीय मंत्र्याने राजीनामा द्यावा"
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Kheri

"लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हत्या, केंद्रीय मंत्र्याने राजीनामा द्यावा"

sakal_logo
By
सुधीर काकडे

उत्तर प्रदेशच्या लखीमपूरमध्ये झालेल्या घटनेनंतर देशभरातून यावर प्रतिक्रीया येत आहेत. या घटनेत चार शेतकऱ्यांसह आठ जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणानंतर उत्तर भारतात वेगवेळ्या ठिकाणी आंदोलनं झाली असून राहूल सर्व विरोधीपक्ष नेत्यांनी त्याचा निषेध केलाय. त्यातच छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल यांनीही या घटनेवरून भारतीय जनता पक्षावर तिव्र आरोप केले आहेत.

हेही वाचा: लखीमपूर - पंजाबमध्ये आंदोलन करणाऱ्या नवज्योत सिंग सिद्धूंना घेतलं ताब्यात

उत्तर प्रदेशमध्ये झालेल्या या घटनेनंतर भुपेश बघेल यांनी भारतीय जनता पक्षाला विरोध सहन करण्याची क्षमता नसल्याचा आरोप केला आहे. " विरोधा उठवलेला कोणताही आवाज भाजप सहन करू शकत नाही. अनेक विरोधीपक्षातील नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे असल्याचा गंभीर आरोप त्यांनी भाजपवर केला. तसेच लखीमपूरमध्ये घडलेली घटना ही एक सामान्य घटना नसून हत्या होती. त्यामुळे केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्र यांना पदावरून हटवण्यात यावे अशी मागणीही बघेल यांनी केली आहे.

loading image
go to top