esakal | Lakhimpur Kheri: आशिष मिश्राचा शोध सुरु, लवकरच होणार अटक
sakal

बोलून बातमी शोधा

Ashish Mishra

Lakhimpur Kheri: आशिष मिश्राचा शोध सुरु, लवकरच होणार अटक

sakal_logo
By
दीनानाथ परब

मुंबई: लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याचा आरोप असलेल्या आशिष मिश्राला (Asish mishra) पकडण्यासाठी शोध सुरु आहे, अशी माहिती लखनऊ रेंजचे आयजी लक्ष्मी सिंह (Lakshmi singh) यांनी दिली. आशिष मिश्रा विरोधात एफआयआरमध्ये हत्येचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. आशिष मिश्रा केंद्रीय मंत्री अजय मिश्रा (Ajay mishra) यांचा मुलगा आहे. रविवारी लखमीपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात आठ जणांचा मृत्यू झाला होता. यात चार शेतकरी होते.

आशिष मिश्राने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला तसचं शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या गाडीमध्ये तो होता, असं एफआयआरमध्ये म्हटलं आहे. सर्वोच्च न्यायलयाने स्वत:हून या प्रकरणाची दखल घेतली आहे. याच संदर्भात सुरू असलेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने उत्तर प्रदेश सरकारला अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.

हेही वाचा: NCBकडून 'त्या' दोघांविषयी उडवाउडवीची उत्तरं! काँग्रेसचा आक्षेप

यामध्ये आरोपी कोण आहेत, कोणाविरोधात एफआयआर नोंदवला आहे आणि अटक केलेल्यांची माहिती अहवालात नमूद करण्याचे आदेश दिले आहेत. भाजपच्या वतीने या ठिकाणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काही शेतकरी भाजपच्या नेत्यांचा विरोध करण्यासाठी काळे झेंडे घेऊन लखीमपूर खेरी या ठिकाणी जमले होते. मात्र शेतकऱ्यांना चिरडण्यात आले.

loading image
go to top