esakal | Lakhimpur Kheri : मिश्रांना बडतर्फ करा - काँग्रेस
sakal

बोलून बातमी शोधा

Lakhimpur Kheri Violence

लखीमपूर खेरी : मिश्रांना बडतर्फ करा - काँग्रेस

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील काँग्रेसची राजकीय लढाई राष्ट्रपती भवनापर्यंत पोहोचली आहे. गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांची हकालपट्टी करावी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत चौकशी व्हावी, त्याशिवाय शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही, असे साकडे राहुल आणि प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना घातले.

राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खर्गे, ए. के. अँटोनी आणि गुलाम नबी आझाद यांचाही शिष्टमंडळात समावेश होता. शिष्टमंडळाने राष्ट्रपतींना निवेदन दिले. या भेटीनंतर राहुल यांनी पत्रकारांना सांगितले, की ‘‘ मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची मागणी आहे की या हत्याकांडाला जबाबदार असणाऱ्यांना कठोर शिक्षा व्हावी. परंतु, ज्या व्यक्तीने हत्या केली आहे त्याचे वडील देशाचे गृह राज्यमंत्री आहेत.

हेही वाचा: कोळसा संकट ही अफवा, भारत पॉवर सरप्लस देश; सीतारामण यांचा दावा

जोपर्यंत ते पदावर आहेत तोपर्यंत न्याय मिळणार नाही याकडे राष्ट्रपतींचे लक्ष वेधण्यात आले.’’ प्रियांका गांधी यांनी गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या बडतर्फीच्या मागणीचा पुनरुच्चार केला. दरम्यान, आशिष मिश्रा याचा निकटवर्तीय अंकित दास याने आज गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकासमोर (एसआयटी) शरणागती पत्कारली. पोलिसांनी ३ ऑक्टोबर रोजीच दास याला समन्स बजावले होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या वर्तमान न्यायाधीशांमार्फत लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांनी राजीनामा द्यावा किंवा त्यांना बडतर्फ करावे, या दोन मागण्यांसह सर्व तपशील राष्ट्रपतींसमोर मांडण्यात आला आहे.

- मल्लिकार्जुन खर्गे, राज्यसभेतील विरोधी पक्षनेते

loading image
go to top