esakal | प्रशांत किशोरांचं काँग्रेसला दणका देणारं वक्तव्य; म्हणाले, 'लखीमपूर खिरीनंतर...'
sakal

बोलून बातमी शोधा

Rahul Gandhi_Prashant Kishor

लखीमपूर खिरी हत्याकांडानंतर चर्चेत अलेल्या काँग्रेसवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला आहे.

Prashant Kishor: काँग्रेसला दणका देणारं वक्तव्य; म्हणाले, 'लखीमपूर खिरीनंतर...'

sakal_logo
By
विनायक होगाडे

नवी दिल्ली : लखीमपूर खिरी हत्याकांडानंतर चर्चेत अलेल्या काँग्रेसवर निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी आपल्या ट्विटर हँडलवर थेट काँग्रेसचं नाव न घेता टीका 'ग्रँड ओल्ड पार्टी' असं म्हणत ही टीका केली आहे. ज्या लोकांना असं वाटतंय की, 'ग्रँड ओल्ड पार्टी'च्या सहाय्याने विरोधकांची तातडीने वापसी होईल ते गैरसमजुतीत आहेत. त्यांच्या हाती निराशा लागेल.

हेही वाचा: मला ईडीची नोटीस पाठवणाऱ्या भाजपला लोकांनी वेडी ठरवलं - पवार

काय म्हटलंय प्रशांत किशोर यांनी?

प्रशांत किशोर यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय की, लखीमपूर खिरी प्रकरणानंतर ग्रँड ओल्ड पार्टीच्या नेतृत्वाखालील विरोधकांची त्वरित आणि तातडीने वापसी होईल, असं जे लोक मानत आहेत, ते लोक स्वत:साठी मोठा अपेक्षाभंग रचून ठेवत आहेत.

दुर्दैवाने, ग्रँड ओल्ड पार्टीच्या मूळाशी असलेल्या काही मूलभूत अडचणी आणि संघटनात्मक यंत्रणेतील पोकळपणा यांवर सध्यातरी कोणताच ठोस आणि तातडीचा असा उपाय नाहीये.

किशोरांची टीका महत्त्वाची

अनेक राजकीय पक्षांना सत्तेच्या मुकूटापर्यंत घेऊन जाणारे प्रशांत किशोर यांचं मत भारतीय राजकारणात महत्त्वाचं मानलं जातं. बंगाल निवडणुकांनंतर अशा शक्यता वर्तवल्या जात होत्या की, प्रशांत किशोर आता काँग्रेसची वाट धरु शकतात. मात्र, त्यांच्या या ट्विटमुळे याप्रकारच्या सगळ्या शक्यतांना पूर्णविराम मिळाला आहे. प्रशांत किशोर अद्यापतरी विरोधकांना भाजपशी लढण्यासाठी तुल्यबळ मानत नाहीत. त्यांनी याआधी देखील असं वक्तव्य केलं होतं ज्यात त्यांनी पक्षाला आपल्या संघटनात्मक संरचनेमध्ये मूलभूत परिवर्तन करण्याची असलेली गरज बोलून दाखवली होती. अशातच आता त्यांचं हे वक्तव्य येऊ घातलेल्या अनेक राज्यातील विधानसभांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं मानलं जात आहे.

हेही वाचा: महाराष्ट्रात 1050 कोटींचे संशयास्पद व्यवहार; आयकर विभागाचा मोठा खुलासा

काँग्रेससाठी मोठा दणका

प्रशांत किशोर यांचं हे वक्तव्य म्हणजे काँग्रेससाठी मोठा दणकाच आहे. लखीमपूर खिरीनंतर उत्तर प्रदेश राज्यातून आपली हरवलेली जमीन शोधू पाहणाऱ्या काँग्रेससाठी त्यांचं ट्विट हे आत्मपरिक्षण करण्यासाठी महत्त्वाचं आहे. याआधी ते काँग्रेससह विरोधकांच्या मोटेमध्ये बसून हवा भरणार असल्याच्या वार्ता होत्या मात्र, सध्यातरी काँग्रेस विरोधकांचं सक्षम नेतृत्व करण्यास पात्र असल्याचं ते मानत नसल्याचं स्पष्ट होतंय.

loading image
go to top