

Lalan Singh
esakal
उत्तर प्रदेश आणि बिहारच्या सीमावर्ती भागात आपल्या गुन्हेगारी कृत्यांनी दहशत निर्माण करणाऱ्या आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या रडारवर असलेल्या एका कुख्यात गुंडाचा अखेर थरारक चकमकीत अंत झाला आहे. वाराणसीत एका पोलीस उपनिरीक्षकाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या करणाऱ्या आणि १ लाख रुपयांचे इनाम असलेल्या 'ललन सिंह ऊर्फ लल्लन' याला सहारनपूर (Saharanpur) पोलिसांनी मध्यरात्री झालेल्या चकमकीत (Encounter) ठार केले आहे. त्याच्या मृत्यूनंतर अनेक वर्षांपासून दहशतीच्या छायेत वावरणाऱ्या पीडित कुटुंबांनी आणि व्यापाऱ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.