Chheda Singh
Chheda Singhesakal

फुलनदेवीचं अपहरण करणाऱ्याला 20 वर्षांनंतर पोलिसांकडून अटक

Summary

छेदा सिंग दोन दशकांपासून जानकी कुंडजवळील एका आश्रमात बाबाच्या वेशात सेवादार म्हणून राहत होता.

भोपाळ : मध्य प्रदेशातील चित्रकूटमध्ये (Madhya Pradesh Chitrakoot) एका आश्रमात बाबा म्हणून वास्तव्य करणाऱ्या 65 वर्षीय छेदा सिंगला त्याच्या मूळ गावातून अटक करण्यात आलीय. 1980 मध्ये फुलनदेवीच्या (Phoolan Devi) अपहरणात त्याचा हात असल्याचं मानलं जातंय. छेदा सिंग (Chheda Singh) उत्तर प्रदेशमधील औरैया जिल्ह्यातील भासौन गावात उपचारासाठी गेला असता, त्याला तिथून अटक करण्यात आलीय.

छेदा सिंग दोन दशकांपासून चित्रकूटमधील जानकी कुंडजवळील एका आश्रमात बाबाच्या वेशात सेवादार म्हणून राहत होता. मध्य प्रदेशातील सतना जिल्ह्यातील रघुराज नगर जंक्शनमधील रहिवासी ब्रिजमोहन दास याच्या नावानं बनवलेलं बनावट ओळखपत्र पोलिसांनी जप्त केलंय. छेदा वयाच्या 23-24 व्या वर्षी चंबळच्या खोऱ्यात लालराम टोळीत सामील झाला होता. तो लालराम टोळीतील सर्वात सक्रिय सदस्यांपैकी एक होता.

Chheda Singh
महाराष्ट्रच नव्हे, तर उत्तर प्रदेशपासून दिल्लीपर्यंत देशातील 'ही' राजकीय घराणी संकटात

लालराम आणि सीताराम सिंग ही टोळी चालवत असतं. त्यांनी त्यांचा प्रतिस्पर्धी टोळीचा नेता बिक्रम मल्लाहची हत्या केल्यानंतर, 1980 मध्ये बिक्रमची मैत्रीण आणि टोळी सदस्य फूलन देवीचं अपहरण केलं. खून, दरोडा, अपहरण आणि खंडणीच्या 20 हून अधिक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवा असलेला छेदाला उत्तर प्रदेश न्यायालयानं फरार घोषित केलं होतं. त्यानंतर यूपी पोलिसांनी ऑक्टोबर 2015 मध्ये त्याच्यावर 50,000 रुपयांचं बक्षीस ठेवलं होतं. दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि नाव बदलून बनवलेले इतर कागदपत्रे जप्त केली आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com