esakal | 'जय श्री राम': न्यायालयाच्या निर्णयानंतर अडवाणी यांचा घोष
sakal

बोलून बातमी शोधा

advani

बाबरी विध्वंस प्रकरणातील खटल्याचा निकाल सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे.

'जय श्री राम': न्यायालयाच्या निर्णयानंतर अडवाणी यांचा घोष

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- बाबरी विध्वंस प्रकरणातील खटल्याचा निकाल सीबीआयच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. सबळ पुराव्या अभावी न्यायालयाने 32 ओरोपींची मुक्तता केली. बाबरी पाडण्याची घटना पूर्वनियोजित नसून हा एक अपघात होता, असं मत न्यायालयाने नोंदवलं आहे. 28 वर्षांपासून सुरु असलेल्या या खटल्याचा निकाल लागला आहे. 

बाबरी मशिद प्रकरण - गेल्या 28 वर्षात काय घडलं?

वादग्रस्त भाग पाडल्याप्रकरणी आरोप करण्यात आला होता. या खटल्यात भाजपचे जेष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, उमा भारती यांच्यावर सीबीआयने आरोप केले होते. मात्र, यांच्यावर केलेले सर्व आरोप चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटलं आहे. न्यायालयाच्या या निकालानंतर विविध स्तरांतून प्रतिक्रिया उमटत आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी न्यायालयाच्या निर्णायांनतर आंनद व्यक्त केला आहे. 'जय श्रीराम' असा घोष करत त्यांनी हा सर्वांसाठी आनंदाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे.

माझ्या आणि भाजपचा राम जन्मभूमी आंदोलनाप्रती असलेल्या समर्पनावर शिक्कामोर्तब झाले आहे. 2019 मधील सर्वोच्च न्यायालयाच्या ऐतिहासिक निर्णयानंतर दुसरा एक महत्वाचा निर्णय न्यायालयाने दिला आहे, असं 92 वर्षीय अडवाणी म्हणाले आहेत. 1992 साली बाबरी विध्वंस प्रकरणी अडवाणी यांच्यासह अन्य 32 जणांवर आरोप करण्यात आले होते. 

loading image