नसबंदीप्रमाणे नोटाबंदीचे होईल- लालूप्रसाद

वृत्तसंस्था
शनिवार, 17 डिसेंबर 2016

नोटाबंदीनंतर निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 50 दिवसांचा वेळ मागितला होता. त्यापैकी 40 दिवस संपले आहेत.

नवी दिल्ली - आणीबाणीच्या काळात काँग्रेसने राबविलेल्या नसबंदी अभियानानंतर जे हाल काँग्रेसचे झाले, तेच नोटाबंदीनंतर भाजपचे होतील. भ्रष्टाचारविरोधी लढ्यात नोटबंदीचा फायदा होणार नाही व काळापैसाही परत येणार नाही, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करुन दीड महीना उलटल्यानंतर लालूप्रसाद यादव यांनी शनिवारी पक्षाच्या खासदारांची व आमदारांची महत्त्वाची बैठक बोलावली होती. या बैठकीत लालूंनी नोटबंदीच्या निर्णयावर टीका केली. या बैठकीत लालूंचे पुञ बिहारचे उपमुख्यमंञी तेजस्वी यादव व आरोग्यमंञी तेजप्रताप यादव हेही उपस्थित होते.

लालूप्रसाद म्हणाले की, नोटाबंदीनंतर निर्माण झालेली समस्या सोडवण्यासाठी पंतप्रधान मोदींनी 50 दिवसांचा वेळ मागितला होता. त्यापैकी 40 दिवस संपले आहेत. काळापैसा परत नाही आला. आज मी काही अर्थतज्ज्ञांना भेटून नोटबंदीचे फायदे व तोटे यावर चर्चा करणार आहे. जेडीयू आणि राजद लवकरच नोटाबंदीविरोधात आंदोलन करणार आहे.

Web Title: Lalu Prasad on demonetisation: Modi's Notebandi will meet same fate as Congress' Nasbandi