Lalu Prasad Yadav: CBI ने 16 ट्रक भरून पुरावे केले होते सादर

Lalu Prasad Yadav Fodder Scam case CBI present 16 truck document in front of court
Lalu Prasad Yadav Fodder Scam case CBI present 16 truck document in front of courtESAKAL

रांची : चारा घोटाळ्यातील (Fodder Scam) 1990 मध्ये डोरंडा ट्रेजरीमधून अवैधरित्या रक्कम काढल्याप्रकरणी आरजेडीचे सर्वेसर्वा लालू प्रसाद यादव (Lalu Prasad Yadav) यांना रांचीच्या विशेष सीबीआय कोर्टाने दोषी ठरवले आहे. सध्या त्यांची रवानगी ही न्यायालयीन कोठडीत झाली आहे. त्यांना किती शिक्षा द्यायची याबाबत कोर्ट 18 फेब्रुवारीला निकाल देणार आहे. दरम्यान, या निकालानंतर या प्रकरणात सीबीआयने कोर्टासमोर तब्बल 16 ट्रक भरून कागदपत्रं जमा केली होती याची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. (Lalu Prasad Yadav Fodder Scam case CBI present 16 truck document in front of court)

डोरंडा ट्रेजरी घोटाळ्यात (Doranda Treasury Withdrawal) आरोपींनी एक वेगळीच ट्रीक वापली होती. डोरंडा ट्रेजरीमधून जास्तीजास्त 50 हजाराचे बील पास करता येत होते. मात्र आरोपींनी हा घोटाळा करण्यासाठी 50 हजार पेक्षा कमीची असंख्य बीलं वेगवेगळ्या भागात वाटून करोडो रूपयांची अवैध्यरित्या रक्कम काढली. या केसमध्ये सीबीआयला पुरावे गोळा करण्यासाठी चांगलीच मेहनत घ्यावी लागली होती. त्यांनी एक एक कागद जोडून आरोपींविरूद्ध तगडी केस उभा केली.

Lalu Prasad Yadav Fodder Scam case CBI present 16 truck document in front of court
लालूप्रसाद यादव चारा घोटाळा प्रकरणी पुन्हा दोषी; जेलमध्ये रवानगी

डोरंडा ट्रेजरी (Doranda Treasury Scam) घोटाळ्यातील घटनाक्रम

  • रांची जिल्ह्यातील डोरंडा ट्रेजरीमधून अवैधरित्या 139.35 कोटी रूपये काढण्यात आले होते.

  • याबाबत आरसी 47 A/96 16 एप्रिल 1996 मध्ये पहिल्यांदा केस दाखल झाली होती.

  • या प्रकरणात 8 मे 2001 मध्ये पहिले आरोपपत्र दाखल झाले.

  • त्यानंतर 7 जून 2003 ला पूरक आरोपत्र दाखल झाले.

  • 16 सप्टेंबर 2005 ला आरोपत्र निश्चित झाले.

  • प्रोसिक्यूशन पुरावे 22 नोव्हेंबर 2005 ते 16 जून 20019 पर्यंत दाखल करण्यात आले.

  • त्यानंतर 20 जून 2005 ते 17 जानेवारी 2020 पर्यंत आरोपींचे जबाब नोंदवण्यात आले.

  • बचाव बक्षाची साक्ष 20 जानेवारी 2020 ते 26 फेब्रुवारी 2021 पर्यंत पूर्ण करण्यात आली.

  • फिर्यादी पक्षाने 2 मार्च 2021 ते 7 ऑगस्ट 2021 पर्यंत आपले म्हणणे मांडले.

  • बचाव पक्षाचे म्हणणे 9 ऑगस्ट ते 29 जानेवारी 2022 पर्यंत ऐकून घेण्यात आले.

  • या प्रकरणात एकूण 170 आरोपी होते. सुनावणीदरम्या त्यातील 55 जणांचा मृत्यू झाला.

  • यातील सात आरोपींना सीबीआयने साक्षीदार बनवले.

  • यातील दोन आरोपींनी सुनावणीपूर्वीच आपला दोष स्विकार केला.

  • या प्रकरणात 575 लोकांची साक्ष झाली.

  • बचाव पक्षाकडून 25 साक्ष सादर करण्यात आल्या.

  • सीबीआयने या प्रकरणात IPC च्या 120 B, 420, 409, 467, 468, 471, 477 आणि पीसी अॅक्टनुसार 13(2), 13(1)(c) नुसार षडयंत्र रचण्याचे आरोप ठेवले होते.

  • सीबीआयने न्यायालयासमोर तब्बल 16 ट्रक भरून कागदपत्रे सादर केली होती.

Lalu Prasad Yadav Fodder Scam case CBI present 16 truck document in front of court
UP Electionबाबत लालू प्रसाद यादव यांचं भाकित; म्हणाले, 'भाजपा...'

लालूंच्या अटकेसाठी आर्मीकडून मदत

चारा घोटाळ्यात जेव्हा अटक वॉरंट जारी झालं होतं त्यावेळी लालूप्रसाद यावद आपल्या पदावूरून पायउतार झाले होते. मात्र ते तुरूंगात जाण्यास तयार नव्हते. बिहार पोलीस देखील त्यांना अटक करण्यास धजावत नव्हते. त्यामुळे सीबीआयचे तत्कलीन संयुक्त निर्देशक यूएन विश्वान यांनी लालू प्रसाद यादव यांच्या अटकेसाठी लष्कराकडे देखील मदत मागितली. त्यावेळी लष्कराने देखील मदत करण्यास नकार दिला होता.

अखेर लालू तुरूंगात गेलेच (Lalu Prasad Yadav Arrest)

याचदरम्यान, 29 जुलै 1997 रोजी रात्री मुख्यमंत्री निवासस्थान घेरण्यात आले. त्यावेळी रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात केली गेली. मात्र लालू प्रसाद यादव यांच्या समर्थकांनी हिंसक आंदोलनाची धमकी दिली. या परिस्थिती लष्कराला तैनात करण्याची चर्चा होऊ लागली. अखेर लालू यावद नमले आणि त्यांनी दुसऱ्या दिवशी सकाळी 30 जुलै 1997 ला गुपचूप सीबीआय कोर्टात शरणागती पत्करली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com