
बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे.
पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री व राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना उपचारांसाठी रांचीहून हवाई रुग्णवाहिकेने दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (एम्स) हलविण्यात आले आहे.
लालू प्रसाद यांच्या फुप्फुसात संसर्ग झाला आहे. तपासणीत त्यांना न्यूमोनिया झाल्याचे निदान झाले. लालूंना श्वास घेण्यास अडथळा येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लालू यांची प्रकृती नाजूक असून त्यांची किडनी 25 टक्केच काम करत आहे. दिल्लीत एम्समध्ये त्यांच्या भेटीसाठी भोला यादव आले आहेत. लालूंसोबत हॉस्पिटलमध्ये त्यांची मोठी मुलगी मीसा भारती आहे. शनिवारी त्यांच्या भेटीला राबडी देवी, तेजस्वी यादव आणि मीसा भारती एम्समध्ये आले होते.
शेतकरी मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल, 'वादळ' राजभवनावर धडकणार
लालूंची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली तरी चांगल्या उपचारांची गरज असल्याने त्यांना ‘एम्स’मध्ये पाठविण्याची शिफारस रांचीच्या ‘रिम्स’ रुग्णालयातील वैद्यकीय मंडळाने शनिवारी केली होती. लालू प्रसाद यादव यांची तब्येत खालावल्याचे समजल्याने त्यांची पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवी, मुले तेजस्वी व तेजप्रताप यादव आणि मुलगी मिसा भारती हे ‘रिम्स’मध्ये पोचले.
‘‘लालू प्रसाद यांनी चांगल्या उपचारांची गरज असून त्यांची नाजूक प्रकृती पाहता त्यांना जामीन देण्याची मागणी राबडी देवी यांनी केली. पण केंद्राच्या आडमुठेपणामुळे त्यांना जामीन मंजूर केला जात नसल्याची टीकाही त्यांनी केली.