शेतकरी मोर्चा मुंबईच्या वेशीवर दाखल, 'वादळ' राजभवनावर धडकणार

दिनेश चिलप मराठे
Sunday, 24 January 2021

केंद्र सरकारचा निषेध करीत महाराष्ट्रातल्या नाशिक येथून शेतकरी मुंबई- आझाद मैदानाकडे कूच करण्यापूर्वी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर शेतकरी जमले होते.

मुंबईः मोदी सरकारने आणलेल्या शेतकरी कायद्याच्या विरोधात दिल्ली पाठोपाठ आता महाराष्ट्र राज्यातही वातावरण तापलं आहे. केंद्र सरकारचा निषेध करीत महाराष्ट्रातल्या नाशिक येथून शेतकरी मुंबई- आझाद मैदानाकडे कूच करण्यापूर्वी नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानावर शेतकरी जमले होते. पुढील रणनीती ठरवित त्यांनी आपला मोर्चा मुंबईकडे वळविला आहे. ट्रक टेम्पो, पिकअप, मोटर सायकिल इतर वाहनांकडून वाहन मोर्चाला सुरुवात केली आहे.

शनिवारी शेतकर्‍यांच्या कायद्याविरोधात निदर्शने करण्यासाठी भाग घेण्यासाठी अनेक शेतकर्‍यांनी मुंबईकडे मोर्चा वळविला. ते येत्या 24 ला जानेवारी रोजी शहरातील ऐतिहासिक आझाद मैदानात एकत्र येण्यासाठीच. 26 जानेवारीपर्यंतयेथेच ठाण मांड़ीत शेतकरी कायद्यांविरोधात आंदोलन सुरू ठेवतील. 26 जानेवारी रोजी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेश कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि राज्यातील अन्य ज्येष्ठ नेते या निषेधार्थ सहभागी होतील आणि शेतकरी मेळाव्याला संबोधित करतील.

वाहन मोर्चा संयुक्त किसान मोर्चाच्या (एसकेएम) बॅनरखाली राबविण्यात येणार आहे. या आंदोलनाचा एक भाग आहे आणि शेतकर्‍यांचे कायदे रद्द करावेत या मागणीसाठी सर्व राज्यातील शेतकरी संघर्ष अधिक तीव्र करण्याचे उद्दिष्ट साधण्यासाठी देशाच्या आर्थिक तसेच महाराष्ट्राच्या राजधानीत मुंबईत येत आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

मोर्च्याच्या आयोजकांनी सांगितले की, नाशिकमधील गोल्फ क्लब मैदानातून सुमारे दहा लाखाच्या जवळपास शेतकरी ट्रक, टेम्पो, पिकअप, मोटरसायकल आणि इतर वाहनांकडून वाहन मोर्चाला सुरुवात केली आहे. वाटेत अन्य शेतकरी त्यांच्यात सामील होतील. हा मोर्चा शनिवारी रात्री इगतपुरी जवळील घाटंडेवी येथे थांबून रविवारी सकाळपासून पुन्हा सुरू होईल.

“हे तीन कायदे शेतकरीविरोधी, लोकविरोधी आणि कॉर्पोरेट समर्थक आहेत आणि ते रद्द करावे, अशी आमची इच्छा आहे. आम्हाला अन्य मागण्यांमध्ये केंद्र सरकारने मोबदला देणारा एमएसपी आणि खरेदीची हमी देणारा केंद्रीय कायदा हवा आहे, असे संयोजक एसकेएम आणि अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष (एआयकेएस) अशोक ढवळे यांनी सांगितले.

24 जानेवारी रोजी शेतकरी मुंबईत जमत आहे. आझाद मैदान येथे भव्य धरणे आंदोलन करण्यात येणार असून त्यानंतर राजभवनावर मोर्चा काढण्यात येणार आहे.  26 जानेवारी, प्रजासत्ताक दिनी ध्वजारोहणानंतर हा निषेध होईल. या आंदोलनात सुमारे दहा लाख शेतकरी भाग घेतील असा संयोजकांनी दावा केलेला आहे.

हेही वाचा- नेरळ- माथेरान घाटात टळली मोठी दुर्घटना, जिप्सी दरीत कोसळता कोसळता वाचली

“शेतमालाच्या कायद्याविरोधात दिल्लीत सुरू असलेल्या निषेधाचे समर्थन करण्यासाठी अनेक राज्यात वाहनांवरुन फेऱ्या काढल्या जात आहेत. महाराष्ट्रात एआयकेएसनेही मुंबई मार्च मोर्चाला सुरुवात केलेली.  एकट्या नाशिक येथून 20 हजार शेतकरी मोर्चात सामील झाले आहेत. आम्ही मुंबईत शेतकरी लाखोंच्या संख्येने पोहोचतील अशी आमची अपेक्षा आहे. जे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी राजभवनमध्ये पोहोचतील आणि राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे मागणीची एक सनद देतील असे अखिल भारतीय किसान सभाचे सरचिटणीस डॉ.अजित नवले यांनी सांगितले.

संध्याकाळी साधारणत: 5 ते 6 च्या दरम्यान मोर्चा आझाद मैदानात पोहोचेल असे डॉ.अजित नवले यांनी सकाळशी बोलताना म्हटले आहे.

----------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Farmers March Mumbai Nashik Azad Maidan agriculture laws


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Farmers March Mumbai Nashik Azad Maidan agriculture laws