
जमिनीच्या बदल्यात नोकरी घोटाळा प्रकरणात राजद प्रमुख लालूप्रसाद यादव यांना सुप्रीम कोर्टाकडून मोठा झटका बसला आहे. शुक्रवारी कोर्टाने लालूंविरुद्धच्या खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीला स्थगिती देण्यास नकार दिला. तसेच, दिल्ली हायकोर्टानेही सुनावणी जलद करण्याचे निर्देश देण्यात आले. लालूंना दिलासा म्हणजे त्यांना खटल्याच्या न्यायालयीन कार्यवाहीत वैयक्तिकरित्या उपस्थित राहण्यापासून सूट देण्यात आली.