मोदी आता शिक्षेसाठी तुम्हीच चौक निवडा- लालू

वृत्तसंस्था
मंगळवार, 27 डिसेंबर 2016

मोदींनी देशातील जनतेला आश्वासन दिले होते की 50 दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल. तसे न झाल्यास भरचौकात जनतेने शिक्षा द्यावी व त्यासाठी तयारीही दर्शविली होती. आता यासाठी तीन दिवसांचा अवधी बाकी असून, त्यांनी शिक्षा भोगण्यासाठी तयार रहावे.

पाटणा - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीच्या निर्णयानंतर जनतेकडे मागितलेला 50 दिवसांचा वेळ संपत आला असून, आता त्यांनीच जनतेकडून देण्यात येणाऱ्या शिक्षेसाठी आवडीचा चौक निवडावा, अशी टीका राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी केली आहे.

पंतप्रधान मोदींनी 8 नोव्हेंबरला पाचशे आणि हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयानंतर बँका आणि एटीएमबाहेर नागरिकांच्या रांगा असल्याने जनतेकडे सर्व परिस्थिती सुधारण्यासाठी आणि काळा पैसा बाहेर येण्यासाठी 50 दिवसांची मुदत मागितली होती. आता 30 डिसेंबरला याची मुदत संपत असून, अद्यापही नागरिकांना पैसे मिळविण्यासाठी अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

लालूप्रसाद यादव यांनी ट्विट करत म्हटले आहे, की मोदींनी देशातील जनतेला आश्वासन दिले होते की 50 दिवसांत परिस्थिती पूर्ववत होईल. तसे न झाल्यास भरचौकात जनतेने शिक्षा द्यावी व त्यासाठी तयारीही दर्शविली होती. आता यासाठी तीन दिवसांचा अवधी बाकी असून, त्यांनी शिक्षा भोगण्यासाठी तयार रहावे. त्यासाठी त्यांनी स्वतःच चौकच निवडावा. नोटाबंदीचा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरला असून, यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला आहे.

Web Title: lalu prasad yadav says pm modi will choose his favorite chauraha for punishment