छट पूजा व दिवाळीत लालूंचा मुक्काम तुरुंगातच!

सकाळ न्यूज नेटवर्क
Friday, 6 November 2020

चारा गैरव्यवहारात कारावासात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना छटचा सण व दिवाळी तुरुंगात साजरा करावा लागणार आहे.

रांची- चारा गैरव्यवहारात कारावासात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांना छटचा सण व दिवाळी तुरुंगात साजरा करावा लागणार आहे. जामीन मिळण्यासाठी त्यांनी केलेल्या अर्जावरील सुनावणी झारखंड उच्च न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलली आहे.

दुमका कोषागारातील निधीचा अपहार केल्याच्या खटल्यात जामीन मिळण्यासाठी लालू प्रसाद यांनी जामिनावरील शुक्रवारी सुनावणी झाली. केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने त्यांची बाजू मांडण्यासाठी वेळ देण्याची विनंती केली. त्यानंतर न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली. यामुळे लालू प्रसाद यादव सध्या तरी तुरुंगातून बाहेर येऊ शकणार नाही. त्यांच्या जामिनावर आता छट महापर्व आणि दिवाळीनंतरच सुनावणी होऊ शकेल.

Video : देवतांची चित्रे असलेले फटाके न विकण्याची मुस्लिम विक्रेत्यांना धमकी

दुमका कोषागारातून अवैध रीतीने निधी काढल्याच्या गुन्ह्यात लालू प्रसाद यादव यांनी निम्मी शिक्षा भोगली आहे. याच आधारावर न्यायालयात त्यांनी जामिनासाठी याचिका दाखल केली. जर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला असता तर लालूंचा बाहेर पडण्याचा मार्ग खुला झाला असता. चारा भ्रष्टाचाराच्या अन्य गुन्ह्यात लालू प्रसाद यादव यांनी यापूर्वीच जामीन मिळालेला आहे. सध्या ते रांचीमधील ‘रिम्स’ रुग्णालयात उपचार घेत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lalu prasad yadav will be in jail during diwali