Video : देवतांची चित्रे असलेले फटाके न विकण्याची मुस्लिम विक्रेत्यांना धमकी

सकाळ वृत्तसेवा
Friday, 6 November 2020

मात्र, या विक्रेत्यांचं म्हणणं आहे की, ते फक्त या फटाक्यांची विक्री करतात. या फटाक्यांना दक्षिण भारतातील राज्यात बनवलं जातं. या फटाक्यांचे निर्माते आम्ही नाही. 

मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील देवास जिल्ह्यामध्ये देवी-देवतांची चित्रे असणाऱ्या फटाक्यांवरुन आता एक वाद समोर आला आहे. या वादाचा एक व्हिडीओदेखील समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये काही लोक फटाके विक्रेत्यांना धमकावताना दिसत आहेत. यामध्ये हिंदू देवीदेवतांची चित्रे असणारे फटाके विकण्यावरुन मुस्लिम दुकानदारांना धमकी दिली जात असल्याचे स्पष्ट दिसत आहे. या लोकांचं म्हणणं आहे की, फटाक्यांवर हिंदू देवतांची चित्रे असता कामा नये. मात्र, या विक्रेत्यांचं म्हणणं आहे की, ते फक्त या फटाक्यांची विक्री करतात. या फटाक्यांना दक्षिण भारतातील राज्यात बनवलं जातं. या फटाक्यांचे निर्माते आम्ही नाही. 

हेही वाचा - चीनच्या दबावाने LAC मध्ये बदल होणार नाही; जनरल बिपिन रावत यांची ठाम भुमिका

या घटनेचा एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. यामध्ये भगव्या रंगाचे उपरणे घातलेले काही लोक दुकानांमध्ये जाऊन विक्रेत्यांना फटाक्यांच्या देवतांच्या चित्रावरुन धमकावत आहेत. त्यांना ते न विकण्याची धमकी देत आहेत.
यामध्ये एक व्यक्ती म्हणत आहे की, जर दुकानात एकदेखील गणेश अथवा लक्ष्मी बाँब विकला गेला तर आम्ही ती गोष्ट करायला लावू, जी करायला आपल्याला आवडणार नाही. या धमकीने हे दुकानदार घाबरले आहेत. 

काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी म्हटलंय, फटाक्यांवर कुणाचं चित्र असावं ही जबाबदारी फटाके बनवणाऱ्यांची आहे. फटाके विकणाऱ्या दुकानदारांची नाही.

हेही वाचा - भारत-चीन तणाव : लष्करी पातळीवर आठव्या बैठकीत दोन्ही देशांनी एकमेकांसमोर ठेवल्या 'या' मागण्या

मोदींजींनी अध्यादेश काढून फटाक्यांवर कोणत्याही देवाधर्माच्या देवतांचे चित्र नसावे, असा अध्यादेश काढावा. देवास जिल्हा प्रशासनाने निर्दोष दुकानदारांवार धमकावणाऱ्या या लोकांवर कारवाई केली पाहीजे.  देवासच्या जिल्हाधिकारी चंद्रमौली शुक्ला यांनी म्हटलंय की हे प्रकरण मला कळल्याबरोबर मी अधिकाऱ्यांना कारवाईचे आदेश दिले आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: muslim shopkeepers threatened for selling crackers with hindu gods images