Tej Pratap Yadav : लालू यादवांनी मुलगा तेजप्रतापला पक्ष आणि कुटुंबातून केले बाहेर

Political Controversy : विवादास्पद वर्तनामुळे लालूप्रसाद यादव यांनी मुलगा तेजप्रताप यादवला सहा वर्षांसाठी पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी करत सर्व संबंध तोडल्याची घोषणा ‘एक्स’वर केली.
Tej Pratap Yadav
Tej Pratap YadavSakal
Updated on

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष आणि ज्येष्ठ नेते लालूप्रसाद यादव यांनी रविवारी मुलगा तेजप्रताप यादव याची सहा वर्षांसाठी पक्ष आणि कुटुंबातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेजप्रतापसोबतचे सर्व कौटुंबिक संबंध देखील तोडून टाकण्यात आले आहेत. ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून त्यांनी ही घोषणा केली. ‘‘ तेजप्रतापने त्याच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये नैतिक मूल्यांकडे डोळेझाक केल्याने आमच्या कुटुंबाच्या सामाजिक न्यायाच्या लढ्याला कोठेतरी तडा गेल्याचे दिसून येते. तेजप्रतापचे काम, सामाजिक वर्तणूक बेजबाबदारपणाची असून तो आमची कौटुंबिक परंपरा आणि मूल्ये यांच्या चौकटीमध्ये बसत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com