कारागीर अशोक चक्रधारी यांनी बनवला 40 तास तेवत राहणारा दिवा; व्हिडिओ व्हायरल

lamp
lamp

रायपूर: छत्तीसगडमधील कोंडगाव येथील कारागीर अशोक चक्रधारी यांनी एक चिखलाचा दिवा तयार केला आहे. यासाठी त्यांना राष्ट्रीय गुणवत्ता पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. अशोक चकधारी पेशाने एक कारागीर आहेत आणि अनेक वर्षांपासून ते कारागिरी करत आहेत.

अलीकडेच त्यांनी एक मातीचा दिवा तयार केला आहे जो सतत 24 ते 40 तास तेवत राहतोय. याबद्दल त्यांचा सन्मानही करण्यात आला आहे. यावर चक्रधारी म्हणतात की, त्यांनी 35 वर्षांपूर्वी असाच दिवा पाहिला होता आणि हे लक्षात ठेऊन हा दिवा बनवला आहे.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यांचा दिवा बनवतानाचा व्हिडिओ कसा व्हायरल झाला आहे हे त्यांनाही माहीत नाही. आता बरीच लोक कारागीर अशोक चक्री यांना फोन करून दिव्याची मागणी करत आहेत. लोक दिव्यांसाठी फोन करून ऑर्डर देत आहेत. याबद्दल बोलताना कारागीर अशोक चक्रधारी म्हणाले की, " मी 35  वर्षांपूर्वी अशा प्रकारचा दिवा पाहिला होता ते लक्षात ठेवूनच मी हा दिवा बनवला आहे. या वर्षी नवरात्रीत मला कुणीतरी बोलावलं आणि मला सांगितलं की, तू बनवलेल्या दिव्यासारखाच मला दिवा पाहिजे.

मला कळलं की माझा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. म्हणूनच लोक मला फोन करत आहेत. सध्या आम्ही दररोज असे 50-60 खास दिवे बनवत आहोत. एका दिव्याची किंमत 200 ते 250 रुपये आहे."

(edited by- pramod sarawale)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com