
काही दिवसांपुर्वीच माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी आता वयाच्या 65 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. ते दुसरे लग्न करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी आली होती
लंडन: काही दिवसांपुर्वीच माजी सॉलिसिटर जनरल हरिश साळवे यांनी आता वयाच्या 65 व्या वर्षी दुसरे लग्न केले आहे. ते दुसरे लग्न करणार असल्याची बातमी गेल्या काही दिवसांपूर्वी आली होती. हरिश साळवे हे देशातील नामांकित अशा वकिलांपैकी एक आहेत. सध्या ते ब्रिटनमध्ये क्वीन्स कौन्सिल आहेत. त्यांनी आपल्या ब्रिटीश मैत्रीणीशी विवाह केला आहे. कॅरोलिन ब्रॉसर्ड असं या मैत्रीणीचं नाव आहे. त्यांनी लंडनमधील चर्चमध्ये हा विवाह केला आहे.
कोरोनामुळे या विवाहात हरिश साळवे यांच्या मित्रांना लोकांना जाता आले नाही. पण काही महत्वाच्या आणि साळवे यांच्या जवळच्या लोकांनी या विवाहास वर्चुअल (ऑनलाईन) हजेरी लावली होती. महत्वाचे म्हणजे त्यात रिलायन्स उद्योगसमुहाचे प्रमुख मुकेश अंबानीही वर्चुअली सामील झाले होते. यामध्ये अंबानी यांनी या दोघांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
The richest man Mukesh Ambani compliments richest lawyer Harish Salve on his second marriage pic.twitter.com/7sTG6gJUWl
— Sheela Bhatt (@sheela2010) October 30, 2020
हरिश साळवे यांनी गेल्या महिन्यातच आपल्या पहिल्या पत्नीशी म्हणजे मीनाक्षी यांच्यापासून घटस्फोट घेतला होता. हरिश आणि मीनाक्षी यांचा संसार 38 वर्षांचा होता आणि त्यांना दोन मुलीसुद्धा आहेत.
चार वर्षीय एस्तेरचं 'वंदे मातरम्' मोदींना भावलं; व्हिडिओ केला शेअर
ख्रिश्चन असलेल्या आपल्या मैत्रीणीशी विवाह करण्याआधी त्यांनी आपला धर्म देखील बदलला आहे. गेल्या काही वर्षांपासून साळवे हे कॅरोलिनसोबत उत्तर लंडनमधील चर्चमध्ये जात होते. या दोघांचेही हे दुसरे लग्न आहे. कॅरोलिन यादेखील 56 वर्षांच्या आहेत. त्यांना एक मुलगीसुद्धा आहे. कॅरोलिन या ब्रिटीश कलाकार आहेत.
हरिश साळवे हे भारतातील सुप्रसिद्ध वकील आहेत. भारत सरकारने त्यांना सॉलिसिटर जनरल म्हणून नियुक्त केलं होतं. 2019 मध्ये साळवे यांनीच पाकच्या ताब्यात असलेल्या भारताच्या कुलभूषण जाधव यांची आंतरराष्ट्रीय न्यायालयात बाजू मांडली होती. हरिश साळवे एका केससाठी लाखो रूपये फी घेतात. मात्र, कुलभूषण केसमध्ये त्यांनी केवळ एक रुपया इतकेच शुल्क घेतले होते.
हेही वाचा - पाक खासदारावर देशद्रोहाची तयारी; 'अभिनंदन' यांना परतवण्याबाबतचं सत्यकथन भोवलं
हरिश साळवे यांनी नागपूरमध्ये शिक्षण घेतले आहे. ते 1976 मध्ये दिल्लीला आले होते. सध्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्यासोबतच त्यांचेही शालेय शिक्षण झाले आहे. हा लग्नसोहळा अत्यंत छोटेखानी स्वरुपात पार पडला. यात केवळ 15 लोक सामिल होते.
(edited by- pramod sarawale)