भू घोटाळा प्रकरण : सुभाष शिरोडकर लोकायुक्तच्या कचाट्यात 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

या तक्रारीसंदर्भात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी मुख्य सचिवांना नोटीस बजावून या कथित जमीन घोटाळासंदर्भातचा अहवाल तसेच त्यासंदर्भातचे सर्व फाईल्स व दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी 14 नोव्हेंबरला ठेवली आहे. सुभाष शिरोडकर यांनी त्यांच्या लाखो चौ. मी. जमिनीसाठी मुख्यमंत्र्यांशी हातमिळवणी करून अनेक पटीने रक्कम वाढवून घेतल्याचा व त्या बदल्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा कथित आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

पणजी : शिरोडा मतदारसंघातील कॉंग्रेसचे माजी आमदार व हल्लीच भाजपमय झालेले सुभाष शिरोडकर यांच्याविरुद्ध 70 कोटींच्या जमीन घोटाळाप्रकरणी ऍड. आयरिश रॉड्रिग्ज यांनी गोवा लोकायुक्तकडे आज (22 ऑक्‍टोबर) तक्रार दाखल केली असून त्यात मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर व मुख्य सचिवांना प्रतिवादी करण्यात आले आहे. लोकायुक्तने या प्रकरणाची दखल घेतल्याने शिरोडकर हे अडचणीत येऊ शकतात. 

या तक्रारीसंदर्भात लोकायुक्त पी. के. मिश्रा यांनी मुख्य सचिवांना नोटीस बजावून या कथित जमीन घोटाळासंदर्भातचा अहवाल तसेच त्यासंदर्भातचे सर्व फाईल्स व दस्तऐवज सादर करण्याचे निर्देश देऊन पुढील सुनावणी 14 नोव्हेंबरला ठेवली आहे. सुभाष शिरोडकर यांनी त्यांच्या लाखो चौ. मी. जमिनीसाठी मुख्यमंत्र्यांशी हातमिळवणी करून अनेक पटीने रक्कम वाढवून घेतल्याचा व त्या बदल्यात त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याचा कथित आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. 

शिरोडा येथील बागायतीची 1.83 लाख चौ. मी. गोवा सरकारने ताब्यात घेऊन त्यापोटी सुभाष शिरोडकर यांना 70 कोटी रुपये दिले आहेत. जमिनीला जादा दर देण्याचा सौदा मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आशिर्वादानेच झाला होता व त्याच्या बदल्यात त्यांनी शिरोडकर यांना भाजपला गरज लागेल तेव्हा प्रवेश करण्याची तयारी ठेवण्यास सांगितले होते. वेदांता रिअल इस्टेट मालक त्यांचे तीन भाऊ अमित, उमेश व सत्तेश हे आहेत व ही जमीन 19 ऑक्‍टोबर 2006 साली 45 रुपये प्रति चौ. मी. दराने खरेदी करण्यात आली होती तीच जमीन सरकारने 3500 रुपये प्रति चौ. मी. दराने विकत घेतली आहे. दरम्यान 5 एप्रिल 2018 रोजी एका जमीन मालकाने सरकारला 1.40 लाख चौ. मी. जमीन 350 रुपये प्रति चौ. मी. दराने देण्याची तयारी दर्शविली होती. त्यासंदर्भातचे पत्र मुख्य सचिवांना पाठविले होते.

Web Title: land acquisition scam in goa Subhash Shirodkar involved