ऋषिकेश-बद्रिनाथ महामार्गावर भूस्खलन; कोणीही अडकले नाही

वृत्तसंस्था
शनिवार, 20 मे 2017

डेहराडून (उत्तराखंड) : उत्तराखंडमधील चामोली जिल्ह्यातून जाणाऱ्या ऋषिकेश-बद्रिनाथ महामार्गावर विष्णूप्रयागजवळ शुक्रवारी रात्री भूस्खलन झाले. मात्र त्यामध्ये कोणीही अडकले नसल्याची माहिती उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी दिली आहे.

शुक्रवारी रात्री विष्णूप्रयागजवळ भूस्खलन झाले. 'पर्वतीय परिसरात मॉन्सूनपूर्व पाऊस झाला. त्यामुळे त्यामुळे बद्रिनाथ मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावर भूस्खलन झाले. परिणामी रस्त्यावरील वाहतूक बंद झाली आहे', अशी माहिती उत्तराखंड सरकारच्या प्रवक्ते अमित चंदोला यांनी दिली. या भूस्खलनामुळे जवळपास 13 हजारपेक्षा अधिक जण अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत होती. भूस्खलनानंतर माध्यमांमध्ये हजारो भाविक अडकल्याची वृत्त आले होते. 'भूस्खलनामध्ये कोणीही अडकलेले नाही. केवळ 1800 पर्यटकांवर परिणाम झाला आहे', अशी माहिती मुख्यमंत्री रावत यांनी दिली आहे. दरम्यान भूस्खलन झालेला रस्ता दुरुस्त करण्याचे काम सुरू असून आज (शनिवार) दुपारपर्यंत रस्ता पूर्ववत होईल, असे वृत्त आहे.

Web Title: Landslide on Rishikesh-Badrinath; no one stranded