दरडी कोसळल्याने किश्‍तवाडचा संपर्क तुटला

वृत्तसंस्था
रविवार, 26 फेब्रुवारी 2017

रस्त्यावर मोठे खडक आणि दगड पडले आहेत.

जम्मू : दरडी कोसळल्याने डोंगराळ भागात असलेल्या किश्‍तवाडचा अन्य शहरांपासून संपर्क तुटला असून, दोडा - किश्‍तवाड महामार्ग बंद झाला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहने येथे अडकून पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दर्बशाळा पट्ट्यात काल मोठ्या प्रमाणात दरडी कोसळण्याची घटना घडल्यामुळे येथील महामार्ग बंद झाला आहे. रस्त्यावर मोठे खडक आणि दगड पडले आहेत.

हा महामार्ग मोकळा करण्यासाठी मनुष्यबळाचा आणि यंत्राचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात येत आहे. या मार्गावर विविध ठिकाणी किमान शंभर वाहने अडकून पडल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: lanslide disconnects kishwad from other cities