

Viral Video of Rizwan Hanif Sparks Debate
esakal
Viral Video of Rizwan Hanif Sparks Debate : लष्कर-ए-तैयबाशी संबंधित एका सदस्याने दावा केला आहे की, गेल्या काही वर्षांत भारतीय एजंट्सनी पाकिस्तानात घुसखोरी करून ३० हून अधिक दहशतवाद्यांना ठार केले आहे. पाकिस्तान वारंवार भारताच्या विरोधात कारस्थाने रचतो, परंतु अनेकदा त्यात अपयशी ठरतो. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने विविध आघाड्यांवर कठोर भूमिका घेतली, ज्यामुळे पाकिस्तानची कोंडी झाली. आता, लष्करच्या एका दहशतवाद्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे पाकिस्तानची हतबलता पुन्हा एकदा उघड झाली आहे.